पुण्याचा दिल्लीवर दणदणीत विजय

By admin | Published: May 5, 2016 11:30 PM2016-05-05T23:30:28+5:302016-05-05T23:32:43+5:30

रायझिंग पुणे सुपरजायंट्सनं दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 19.1 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 166 धावा काढून दणदणीत विजय मिळवला

Victory over Pune's victory in Delhi | पुण्याचा दिल्लीवर दणदणीत विजय

पुण्याचा दिल्लीवर दणदणीत विजय

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - रायझिंग पुणे सुपरजायंट्सनं दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 19.1 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 166 धावा काढून दणदणीत विजय मिळवला आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सन दिलेलं 163 धावांचं लक्ष्य रायझिंग पुणे सुपरजायंट्सनं भेदक फलंदाजीच्या जोरावर भेदलं. कॅप्टन कूल धोनीनं 20 चेंडूंमध्ये 1 चौकार आणि 2 षटकारांसह 27 धावांची आघाडी उभारली. तर रहाणेनं नाबाद खेळत 48 चेंडूंत 7 चौकार मारून 63 धावा काढत हाफ सेंच्युरी केली.ख्वाजा 2 चौकार आणि 1 षटकार ओढत 30 धावा करून तंबूत परतला. तिवारीनं प्रत्येकी 1 चौकार आणि 1 षटकार लगावत 21 धावा केल्या. तर पेरेरानंही अटीतटीच्या लढतीत शेवटपर्यंत नाबाद खेळत 5 चेंडूंत 2 शानदार षटकार मारत 14 धावा काढल्या. रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर दिल्लीची अनुभवी तगडी फलंदजी ढासळली, दिल्लीने निर्धारित २० षटकात ७ गड्यांच्या मोबदल्यात धावा १६२ केल्या. पुणे संघाला या स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी २० षटकात १६३ धावांची गरज आहे. कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोंलदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या शिस्तबद्ध गोलंदाजी पुढे सर्वचं महत्वाच्या फलंदाजांनी नांगी टाकाली. मागील सामन्यात चागंली फलंदाजी करणारा पंथ आज वैयक्तिक २ धावावर बाद झाला. त्याला डिंडाने बाद केले. 

Web Title: Victory over Pune's victory in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.