विडणी गावची कोरोनामुक्तीकडे वाटचाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:28 AM2021-06-01T04:28:57+5:302021-06-01T04:28:57+5:30

कोळकी : फलटण तालुक्यात कोरोना हॉटस्पाॅटमध्ये समाविष्ट असलेल्या विडणी गावाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असल्याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गावाचे ...

Vidani village on its way to coronation! | विडणी गावची कोरोनामुक्तीकडे वाटचाल!

विडणी गावची कोरोनामुक्तीकडे वाटचाल!

googlenewsNext

कोळकी : फलटण तालुक्यात कोरोना हॉटस्पाॅटमध्ये समाविष्ट असलेल्या विडणी गावाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असल्याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गावाचे कौतुक केले.

फलटण तालुक्यातील कोरोना हॉटस्पाॅट गावांचा दौरा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी केला. यावेळी फलटण तालुक्यातील सर्वात मोठे अन् कोरोनाचे हॉटस्पाॅट असलेल्या विडणी गावाला भेट देऊन या ठिकाणच्या कोरोना केअर सेंटरमधील बाधित रुग्णांची विचारपूस केली. आरोग्य सुविधा, ग्रामपंचायतीच्या सोयी-सुविधा, बाधित रुग्णांना उपचाराबाबतच्या अडचणी, आरोग्य उपकेंद्रात औषध पुरवठा तसेच कोरोना चाचणी किटचा पुरवठा होत आहे का? याबाबत माहिती घेतली. तसेच ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोग फंडातून कोविड केअर सेंटरसाठी २५ टक्के रक्कम खर्च करण्याच्या सूचना दिल्या.

आरोग्य उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नयन शेंडे यांनी विडणीत आजअखेर ७७४ बाधित रुग्ण सापडले तर २२ जणांंचा मृत्यू झाला असून, ७५२ रुग्ण योग्य उपचारामुळे बरे झाल्याचे सांगून विडणीत सध्या फक्त ३६ रुग्ण बाधित असल्याचे सांगितले. त्यांच्यावर योग्य पद्धतीने मार्गदर्शन आणि उपचार सुरू असून, लवकरच कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिला जाईल, अशी माहिती दिली.

यावेळी प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी अमिता गावडे, पोलीस निरीक्षक नितीन सावंत, डॉ. बाळासाहेब शेंडे, डॉ. नयन शेंडे, सहदेव शेंडे, सरपंच रुपाली अभंग, पोलीसपाटील धनाजी नेरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

(चौकट)

हलगर्जीपणा आढळल्यास कारवाई करा...

जिल्हाधिकाऱ्यांनी आशा सेविकांच्या रजिस्टरची पाहणी करून सर्वेक्षणाबाबत माहिती विचारली असता, त्यात तफावत दिसून आल्याने कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी दैनंदिन कामकाज पारदर्शक करून अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांना द्यावा. कामात हलगर्जीपणा आढळल्यास कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

३१विडणी

फोटो - विडणी येथील कोरोना केअर सेंटरच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी माहिती घेतली. (छाया : सतीश कर्वे )

Web Title: Vidani village on its way to coronation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.