Video : 'यूनेस्को'ची परवानगी मिळवली, एक बार जो उदयनराजेंनी 'कमिटमेंट' कर दी...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 10:35 PM2019-07-19T22:35:24+5:302019-07-19T22:39:09+5:30
फॉरेस्ट डिपार्टमेंट, रेव्हेन्यू डिपार्टमेंटची परवानगी आपण मिळवू शकतो.
सातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाचे ओटीभरण शुक्रवारी पालिकेच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कास तलावाचे उंची वाढविण्याचे काम पुढील वर्षी पूर्ण होईल. या कामामुळे सातारकरांचा पुढील पन्नास ते साठ वर्षांचा पाणीप्रश्न मिटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
फॉरेस्ट डिपार्टमेंट, रेव्हेन्यू डिपार्टमेंटची परवानगी आपण मिळवू शकतो. पण, युनेस्कोची परवानगी आज आपण मिळवली. त्यामुळे या कामाला सुरुवात झाली, या वर्षाअखेरपर्यंत हे संपूर्ण काम पूर्ण होईल. त्यानंतर, वीजनिर्मित्ती प्रकल्प होईल, ज्याचा स्ट्रीट लाईटींगसाठी उपयोग आम्ही करणार आहोत, असे उदयनराजे म्हणाले. तसेच, उदयनराजेंनी एकदा कमिटमेंट केली ती आपण पूर्ण करत असतो, असे म्हणत पुन्हा एकदा आपल्य स्टाईलमध्ये त्यांनी पत्रकारांसमोर कॉलर उडवून दाखवली. तसेच, एक बार मैने कमिटमेंट कर दी तो उपरवालाही नही, निचेवालाभी अपनी सुनता है... असा डायलॉग उदनयराजेंनी मारला.
दरम्यान, उदयनराजे आणि त्यांची कॉलर उडविण्याची स्टाईल सर्वश्रूत आहे. त्याची झलक यावेळी पुन्हा एकदा पहायला मिळाली. पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर त्यांनी आपल्या हटके शैलीत कॉलर तर उडविलीच.
उदयनराजेंनी एक बार कमिटमेंट कर दी तो... pic.twitter.com/XOllTZiXWS
— Lokmat (@MiLOKMAT) July 19, 2019