VIDEO : पालखीचा सोहळा थांबवून अॅम्ब्युलन्सला दिला रस्ता
By Admin | Published: June 26, 2017 06:50 PM2017-06-26T18:50:34+5:302017-06-26T19:17:32+5:30
ऑनलाइन लोकमत सातारा, दि. २६ - श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोमवारी निंभोरे येथील विसाव्याकडे चालली असताना लोणंदहून फलटणकड़े ...
ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. २६ - श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोमवारी निंभोरे येथील विसाव्याकडे चालली असताना लोणंदहून फलटणकड़े निघालेली अॅम्ब्युलन्स याच गर्दीत सापडली. तेव्हा वारकऱ्यांनी चक्क पालखीचा सोहळा काही काळ जाग्यावरच थांबवला अन अॅम्ब्युलन्सला रस्ता मोकळा करुन देत तिला मार्गस्थ केले.
माऊलींची पालखी निंभोरे विसावा तळाकडे वळत असताना पाठीमागून आलेली अॅम्ब्युलन्स गर्दीत अडकली होती. हे पाहून गावातील तरुणांनी तत्काळ वारकऱ्यांशी संवाद साधला. आतमध्ये एक अत्यवस्थ रुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले. तेव्हा पालखीसमोर चालणाऱ्या वारकऱ्यांनीही आपला सोहळा जाग्यावर थांबवत अॅम्ब्युलन्सला वाट मोकळी करून दिली.
अॅम्ब्युलन्स मार्गस्थ झाल्यावर वारकरी अन ग्रामस्थांनी "माउलीss माउली"चा जयघोष करत आनंद व्यक्त केला.
"आमच्या गावातील तरुणांनी दाखवलेली समयसूचकता कौतुकास पात्र आहे. पोलिसांनीही वेळेवर मदत दिल्याने हे शक्य झाले," असं निंभोरेचे सरपंच शिवाजीराव जाधव यांनी "लोकमत"ला सांगितले. तर "वारीत असे प्रसंग वारवार घडतात पण पोलिस सतर्क असल्याने वेळेवर मदत मिळते," अशी प्रतिक्रिया गोकुळ महाराज शिंपी यांनी व्यक्त केली.
https://www.dailymotion.com/video/x8456of
https://www.dailymotion.com/video/x8456of