VIDEO- साता-यात विद्युत खांब कोसळून तिघे जखमी !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2017 07:28 PM2017-08-10T19:28:05+5:302017-08-10T19:28:46+5:30
सातारा, दि. 10 - येथील पंताचा गोट परिसरात दुपारी साडे तीनच्या सुमारास विजेचा खांब तुटून झालेल्या अपघातात वायरमनसह तीन ...
सातारा, दि. 10 - येथील पंताचा गोट परिसरात दुपारी साडे तीनच्या सुमारास विजेचा खांब तुटून झालेल्या अपघातात वायरमनसह तीन जण जखमी झाले आहेत. रस्त्यावर खांब कोसळताच शेजारून निघालेले पादचारीही घाबरले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेतील सर्व दृश्ये सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, पंताचा गोट परिसरात दुपारी तीनच्या सुमारास विद्युत बिघाडाची तपासणी करण्यासाठी महावितरण कंपनीचे कर्मचारी विजेच्या खांबावर चढले होते. शिडी लावून खांबावर चढलेले वायरमन विद्युत बिघाड दुरुस्तीचे काम करीत असल्याचे अनेकजण पाहात होते. तेवढ्यात कट्ट असा आवाज होऊन वायरमनसह विद्युत खांब रस्त्यावर कोसळला. ही घटना घडताच तातडीने परिसरातील नागरिकांनी जखमींकडे धाव घेतली. विद्युत पुरवठा खंडीत असल्याची खात्री करून जखमींना रुग्णालयाकडे नेण्यात आले. खांब कोसळल्यामुळे रस्त्यावर लावण्यात आलेल्या दुचाकींचेही नुकसान झाले आहे.
पंताचा गोट येथील प्रकाश लॉज जवळ दुपारी खांबावर तीन कर्मचारी कमा करत होते. दुपारी पावसाची रिमझिम होती, त्यामुळे खांबही घसरडे झाले होते. तर कर्मचा-यांकडे देखील सुरक्षिततेची कोणतीच साधने नव्हती. त्यामुळे भर पावसात ५० फुटांहून अधिक उंचीवर हे तीन कर्मचारी तोल सांभाळत काम करत होते. या खांबावर उच्च दाबाची अर्थींग तार बसविण्याचे काम सुरू होते. मुळातच या खांबावर उच्च दाबाची विद्युत वाहिनी व लघु दाबाची विद्युत वाहिनी अशा दोन प्रकारच्या तारा होत्या.