विद्यादान म्हणजे पवित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:31 AM2021-01-04T04:31:50+5:302021-01-04T04:31:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पाचगणी : ‘विद्यादान हे सर्वात पवित्र दान आहे. त्याची मोजदाद ही कशातच करता येत नाही. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचगणी : ‘विद्यादान हे सर्वात पवित्र दान आहे. त्याची मोजदाद ही कशातच करता येत नाही. विद्यादानातून शैक्षणिक व सुसंस्कृत पिढी धडविण्याचे कार्य शिक्षक करीत असतो. याच शैक्षणिक कार्याला स्वतःला अक्षरशः वाहून घेतलं होतं, म्हणूनच ते विद्यार्थीप्रिय शिक्षक झाले होते,’ असे गौरवोदगार प्राचार्य राजकुमार बिरामने यांनी काढले.
कुडाळ (ता. जावळी) येथील महाराजा शिवाजी हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद संस्थेचे विश्वस्त सी. के. जगताप होते. यावेळी माजी मुख्याध्यापक सी. के. गायकवाड, पी. टी. गोळे, व्ही. के. एस. बी. दळवी, एस. ए. जगताप, एल. जे. पवार, बी. ई. सावळकर, एस. व्ही. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमोद पवार यांनी सूत्रसंचालन केले. आर. एन. बर्गे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास शालेय शिक्षक, मित्र परिवार, विद्यार्थी उपस्थित होते.