माण बाजार समितीच्या सभापतिपदी विलास देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:44 AM2021-08-21T04:44:22+5:302021-08-21T04:44:22+5:30
दहिवडी : माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपचे विलास देशमुख, तर उपसभापतिपदी रासपच्या वैशाली विरकर यांची ...
दहिवडी : माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपचे विलास देशमुख, तर उपसभापतिपदी रासपच्या वैशाली विरकर यांची निवड झाली.
माण बाजार समितीच्या सभापती, उपसभापती निवडीसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीमध्ये सभापतिपदासाठी आमदार जयकुमार गोरे, रासप युती तर्फे विलास देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, देसाई गटातर्फे रामचंद्र झिमल यांनी अर्ज दाखल केला. देशमुख यांना दहा मते, तर विरोधात उभे असलेल्या रामचंद्र श्रीरंग झिमल यांना सात मते मिळाली. उपसभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीसाठी भाजप व रासप युतीच्या उमेदवार वैशाली बाबासाहेब वीरकर या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. त्यांच्या विरोधातील उमेदवार रामचंद्र श्रीरंग झिमल व कुंडलिक दादासाहेब भोसले यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे वैशाली वीरकर बिनविरोध निवडून आल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजया बाबर, अधिकारी ए. आर. यलमर व बाजार समितीचे व्यवस्थापक रमेश जगदाळे यांनी काम पाहिले.
सभापतिपदासाठी बोट वर करून मतदान प्रक्रिया पार पाडण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार भाजप व रासप युतीचे विलास आबा देशमुख बहुमताने सभापती झाले.
फोटो
२०विलास देशमुख
२०वैशाली वीरकर