दिवस उगवायलाच ग्रामस्थ लसीकरण केंद्रात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:36 AM2021-05-01T04:36:24+5:302021-05-01T04:36:24+5:30
आदर्की : फलटण तालुक्यातील बिबी, सासवड, हिंगणगाव, आदर्की बुद्रुक येथील लसीकरण केंद्रांवर पहाटेपासून लसीकरणासाठी गर्दी होत आहे. त्यामुळे लसीकरण ...
आदर्की : फलटण तालुक्यातील बिबी, सासवड, हिंगणगाव, आदर्की बुद्रुक येथील लसीकरण केंद्रांवर पहाटेपासून लसीकरणासाठी गर्दी होत आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रच कोरोनाचे हॉटस्पाॅट होते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.
फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात बिबी प्राथमिक आरोग्य केंद्रात
मोठ्या प्रमाणात लसीकरण केले जात आहे. त्याबरोबर
सासवड, आदर्की, हिंगणगाव आरोग्य उपकेंद्रावर लसीकरण करण्यात येत आहे.
काही दिवसांपासून लसीकरणासाठी उपकेंद्राच्या आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ, महिला सकाळी सहा वाजल्यापासूनच आरोग्य केंद्राच्या आवारात जमा होण्यास सुरुवात होते. त्यावेळी आरोग्य कर्मचारी नसल्याने आलेले ग्रामस्य, माहिला यांना सूचना करण्यासाठी कोणीही नसते. त्यानंतर सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत चारशे ते पाचशेचा जमाव जमतो.
त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. सकाळी दहाच्यादरम्यान लसीकरणास सुरुवात होते. त्यानंतर उपलब्ध लस संपल्यानंतर रुग्ण घरी परत जातात.
व परत दुसऱ्यादिवशी येतात. त्यामुळे कोराेनाचे संसर्ग होण्याचा धोका आहे. तरी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकारी आरोग्य केंद्रास भेटी देऊन आरोग्य
कर्मचारी स्टाफ वाढवून जेवढे लसीकरण उपलब्ध होईल तेवढ्याच लोकांना थांबवून ठेवावे व इतरांचे दुसऱ्या दिवसाचे नियोजन करण्याची मागणी होत आहे.
नाहीतर या लसीकरण केंद्र च कोरोनाचे हॉटस्पॉट होण्याची भीती व्यक्त होत आहे.
फोटो सूर्यकांत निंबाळकर यांनी मेल केला आहे.
बिबी ता . फलटण येथील लसीकरण केंद्रावर ग्रामस्थांची मोठी गर्दी होत आहे.