कोयना खोऱ्यातील गावे सुविधांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:26 AM2021-06-19T04:26:08+5:302021-06-19T04:26:08+5:30

पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील कोयना खोऱ्यातील अनेक गावे आजही सुविधांपासून वंचित आहेत. दळणवळन, मोबाइल नेटवर्क, विजेची दुरवस्था, आरोग्य ...

Villages in Koyna valley are deprived of facilities | कोयना खोऱ्यातील गावे सुविधांपासून वंचित

कोयना खोऱ्यातील गावे सुविधांपासून वंचित

googlenewsNext

पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील कोयना खोऱ्यातील अनेक गावे आजही सुविधांपासून वंचित आहेत. दळणवळन, मोबाइल नेटवर्क, विजेची दुरवस्था, आरोग्य व्यवस्था या सुविधांची वणवा आजही जाणवत असल्याने, येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने आम्हाला आता तरी नागरी सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी आर्त हाक येथील ग्रामस्थ देऊ लागले आहेत.

महाबळेश्वर तालुक्यातील कोयनेचा बॅकवॉटर परिसरात वसलेली गावे महाबळेश्वरपासून तीस ते चाळीस किलोमीटरवर आहेत. पावसाळ्यात विद्युत पुरवठा खंडित होणे, मोबाइल नेटवर्क आदी समस्यांमुळे मुलांच्या ऑनलाइन शिक्षणाचा खेळ सुरू आहे. महाबळेश्वर तालुका हा पर्यटनस्थळदृष्ट्या निसर्ग संपन्न आहे. मात्र, कोयना धरणाच्या शेवटच्या टोकावर वसलेली दाभे मोहन, दाभे, दाभेकर, शिरनार, खरोशी ही गावे मात्र, आजही सेवा-सुविधांपासून वंचित आहेत. या गावांमधील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. मोबाइल नेटवर्क नसल्याने मुलांना ऑनलाइन शिक्षण घेता नाही. शिक्षणाची कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यात आरोग्य व्यवस्था सक्षम नसल्याने, कोरोना काळात एखादा रुग्ण गंभीर झाल्यास त्याला रुग्णालयात नेताना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. आम्ही असंच जगायचं का, आम्हाला मूलभूत सुविधा कधी मिळणार, अशी आर्त हाक येथील ग्रामस्थ देऊ लागले आहे.

(कोट)

कोयना जलाशयाच्या काठावर आमची गावे वसली आहेत. पावसाळ्यात आम्हाला खूपच समस्यांचा सामना करावा लागतो. शासनाने आमच्या अडचणी समजून घेऊन दळणवळण, मोबाइल नेटवर्क, वीज, आरोग्य सुविधा यांसारखे प्रश्न प्राधान्याने सोडवावे, एवढीत अपेक्षा आहे.

- शैलेश शिंदे, सरपंच, दाभेमोहन

Web Title: Villages in Koyna valley are deprived of facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.