मसूर विभागातील गावे पाण्यामुळे समृद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:38 AM2021-03-05T04:38:43+5:302021-03-05T04:38:43+5:30
गोसावेवाडी (ता. कऱ्हाड) येथे ग्रामपंचायत खोली, सभामंडप, वॉल कंपाऊंड आदी कामांचे भूमिपूजन व उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ...
गोसावेवाडी (ता. कऱ्हाड) येथे ग्रामपंचायत खोली, सभामंडप, वॉल कंपाऊंड आदी कामांचे भूमिपूजन व उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य रमेश चव्हाण, सह्याद्री कारखान्याचे माजी संचालक तानाजीराव जाधव, अरविंद जाधव, माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव संकपाळ, सुनील पाटील, किसन पाटील, अशोक चव्हाण, बाबासाहेब चव्हाण, बाळासाहेब जाधव, सरपंच रामचंद्र बनसोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पंचायत समिती सदस्य रमेश चव्हाण म्हणाले, एकीतून गावचा विकास साधता येतो. त्यामुळे ग्रामस्थांनी गावची एकी कायम ठेवावी. वडोली-भिकेश्वर गणातील प्रत्येक गावात पालकमंत्री बाळासाहेब पाटील, अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व पंचायत समितीच्या माध्यमातून विविध कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे.
माजी सरपंच आनंदा पवार, विक्रांत शिंदे, विलास पवार, सुखदेव गोसावी, संजय शिंदे, अभिजित पवार, संपत जगदाळे, संभाजी शिंदे, विनोद शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रवीण पवार यांनी सूत्रसंचालन केले. लालासाहेब शिंदे यांनी आभार मानले.
- चौकट
पेयजल योजनेत प्राधान्य द्यावे
कऱ्हाड तालुक्याच्या उत्तरेकडील टोकावर डोंगर पायथ्याशी वसलेल्या गोसावेवाडी गावात विविध विकास कामे झाली आहेत. मात्र ग्रामस्थांना सध्या पिण्याच्या पाण्याची अडचण असून, येथील पेयजल योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती दत्तात्रय शिंदे व प्रवीण पवार यांनी केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या योजनेस प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.
फोटो : ०४केआरडी०३
कॅप्शन : गोसावेवाडी (ता. कऱ्हाड) येथे सभामंडपाचे भूमिपूजन मानसिंगराव जगदाळे यांच्याहस्ते झाले. यावेळी रमेश चव्हाण, अशोकराव संकपाळ, तानाजीराव जाधव आदी उपस्थित होते.