राष्ट्रीय रोड सायकलिंग स्पर्धेसाठी विनय नाईक याची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:14 AM2021-03-04T05:14:15+5:302021-03-04T05:14:15+5:30
सातारा : सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने, पनवेल (महाराष्ट्र) येथे ५ मार्चपासून ...
सातारा : सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने, पनवेल (महाराष्ट्र) येथे ५ मार्चपासून सुरू होत असलेल्या पंचविसाव्या राष्ट्रीय रोड सायकलिंग स्पर्धेसाठी साताऱ्याच्या विनय नाईक याची निवड झालेली आहे.
कन्याकुमारी ते लेह लडाख असा चार हजार ८०० किलोमीटरचा प्रवास त्याने ३९ दिवसांमध्ये पूर्ण केला. तसेच गिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या अ लांंगेस्ट सिंगल लाइर्न ऑफ बायसायकल परेड यामध्येही त्याचा सहभाग होता.
आतापर्यंत अनेक जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय सायकल स्पर्धेत भाग घेऊन त्याने चांगले यश मिळवले आहे.
नुकत्याच औरंगाबाद येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य संघ निवड चाचणीमध्ये इंडियन मेड सायकल या श्रेणीमध्ये दुसरा क्रमांक मिळवून साताऱ्याच्या विनय नाईक याने राष्ट्रीय स्पर्धेत आपले स्थान पक्के केले.
पनवेल (महाराष्ट्र) येथे ५ मार्चपासून सुरू होत असलेल्या पंचविसाव्या राष्ट्रीय रोड सायकलिंग स्पर्धेत ‘इंडियन मेड सायकल’ या श्रेणीमध्ये विनय महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
सिंगल फोटो आहे...