शिरवळ येथे संचारबंदीचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:38 AM2021-04-10T04:38:25+5:302021-04-10T04:38:25+5:30
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ याठिकाणी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केलेल्या संचारबंदीच्या आदेशाचा भंग ...
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ याठिकाणी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केलेल्या संचारबंदीच्या आदेशाचा भंग करीत विनाकारण फिरत असताना आढळून आल्याने ४ जणांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरवळ पोलीसांच्या धडक कारवाईमुळे शिरवळमध्ये खळबळ उडाली आहे.कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यामध्ये संचारबंदीचा आदेश लागू केलेला आहे.
त्यानुसार शिरवळ (ता. खंडाळा) याठिकाणी शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस हवालदार प्रशांत वाघमारे, पोलीस हवालदार अरुण भिसे-पाटणकर हे गस्त करीत असताना शिरवळ हद्दीमधील एका रुग्णालयाच्या रस्त्यावर हरिओम लक्ष्मण सिंह (वय २८ मूळ रा. राजस्थान सध्या रा. धनगरवाडी ता. खंडाळा), प्रवीण दिलीप घोरपडे (वय २५,रा. अपशिंगे सध्या रा. शिरवळ ता. खंडाळा), विनोद रोहिदास मरगजे (वय ४१, मूळ रा. रामी ता. सिंधखेड जि. धुळे सध्या रा.शिरवळ ता.खंडाळा), संदेश भानुदास साळुंखे (वय ३१ रा.तळदेवपठार, धनकवडी ता. हवेली जि. पुणे सध्या रा. शिरवळ) यांनी विनाकारण फिरत सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या संचारबंदीचा आदेशाचा भंग केल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी पोलीस हवालदार प्रशांत वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित चार जणांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून, अधिक तपास पोलीस हवालदार अरुण भिसे-पाटणकर हे करीत आहे. शिरवळ पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे शिरवळ परिसरात खळबळ उडाली आहे.