पुसेसावळीतील नागरिकांकडून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:35 AM2021-04-14T04:35:48+5:302021-04-14T04:35:48+5:30
पुसेसावळी : खटाव तालुक्यातील पुसेसावळीत आसपासच्या परिसरातून मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक येत असल्याने पुसेसावळीमध्ये कोरोनाचा धोका निर्माण ...
पुसेसावळी : खटाव तालुक्यातील पुसेसावळीत आसपासच्या परिसरातून मोठ्या प्रमाणावर
जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक येत असल्याने पुसेसावळीमध्ये कोरोनाचा धोका
निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी पुसेसावळीसह परिसरातील नागरिकांकडून
शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याचे चित्र दिसत आहे.
जीवनावश्यक वस्तू विक्रीच्या नावाखाली काही दुकानदार जादा दराने वस्तूंची विक्री करत आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणावर रुग्णांची गर्दी होत आहे. काही वैद्यकीय व्यावसायिक वैद्यकीय सेवेच्या नावाखाली इतर मालाची विक्री करताना दिसत आहेत. तरी
भाजीपाला व फळ विक्रेते एका जागी ठिय्या मांडून संचारबंदीचे उल्लंघन करताना दिसत आहेत.
तरी पुणे, मुंबई आदी ठिकाणांहून गावी आलेल्या नागरिकांना कोरोनाच्या बाबतीत
कसलेही गांभीर्य नाही. गावामधील युवक विहिरीमध्ये आंघोळीला जाण्याचे प्रकार दिसत आहेत. त्याचबरोबर विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.