Satara: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग; मिरवणुकीत बीम लाइट लावल्याने गुन्हा दाखल
By दीपक शिंदे | Updated: September 18, 2024 18:22 IST2024-09-18T18:22:09+5:302024-09-18T18:22:50+5:30
सातारा : सातारा शहरातील गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाचा भंग करून बीम लाईट लावल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी शहर ...

Satara: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग; मिरवणुकीत बीम लाइट लावल्याने गुन्हा दाखल
सातारा : सातारा शहरातील गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाचा भंग करून बीम लाईट लावल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, १६ सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास शहरातील नगरपालिका चाैकातून गणेश मंडळाची मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाचा भंग करून बीम लाईट लावण्यात आले. यामुळे पोलिसांनी महादेव आनंदा खापणे (रा. कोल्हापूर) यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला.
तसेच रात्री नऊच्या सुमारास गोडोली येथील तलाठीनगर येथेही मिरवणुकीत बीम लाईट लावण्यात आले होती. याप्रकरणी पोलिसांनी ब्रदर लाईट सिस्टीमच्या मालकाच्या विरोधात (पूर्ण नाव माहिती नाही) गुन्हा नोंद केला आहे. हे दोन्हीही गुन्हे सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद झाले आहेत. पोलिस अधिक माहिती घेत आहेत.