विवेकानंदांनी अष्टांग मार्गातून जीवनाचे सार सांगितले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:32 AM2021-01-14T04:32:02+5:302021-01-14T04:32:02+5:30

पाटण येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयात सामाजिक शास्त्र मंडळ व एनसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती ...

Vivekananda explained the essence of life through the Ashtanga path | विवेकानंदांनी अष्टांग मार्गातून जीवनाचे सार सांगितले

विवेकानंदांनी अष्टांग मार्गातून जीवनाचे सार सांगितले

Next

पाटण येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयात सामाजिक शास्त्र मंडळ व एनसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रा. विनायक राऊत, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सी. यु. माने, प्रा. आर. जी. कांबळे, प्रा. एस. पी. पाटील, प्रा. व्ही. एस. पानस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. विनायक राऊत म्हणाले, हिंदवी स्वराज्य स्थापनेचा संकल्प करून राजमाता जिजाऊ यांनी तो पूर्ण केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर त्यांनी केलेल्या संस्कारामुळेच ते आदर्श राजा होऊ शकले. जिजाऊंनी सामाजिक कार्यही केले. पुरुषप्रधान सांस्कृतीत राजमाता जिजाऊंनी आदर्श निर्माण केला.

डॉ. चंद्रकांत माने म्हणाले, राजमाता जिजाऊंनी संस्कृती निर्माण केली, तर स्वामी विवेकानंदांनी भारताची संस्कृती जपली. सुरक्षा आणि मायेची फुंकर घालून रयतेचा आत्मविश्वास वाढविणाऱ्या आणि स्वराज्य घडविणाऱ्या राजमाता या अवघ्या मराठी मुलुखाच्या माऊली आहेत.

प्रा. एस. पी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एच. व्ही. काटे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. आर. जी. कांबळे यांनी आभार मानले.

फोटो : १३केआरडी०१

कॅप्शन : पाटण येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात डॉ. प्रशांत फडणीस यांचे भाषण झाले.

Web Title: Vivekananda explained the essence of life through the Ashtanga path

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.