गावोगावी घुमतोय बालमावळ्यांचा आवाज!

By admin | Published: September 30, 2016 01:22 AM2016-09-30T01:22:43+5:302016-09-30T01:25:37+5:30

मराठा महामोर्चा : बैठकांमध्येही ज्येष्ठांसोबत चिमुकल्यांचे भाषण; ध्वनीक्षेपकावरूनही साद

Voluptuous voice of village! | गावोगावी घुमतोय बालमावळ्यांचा आवाज!

गावोगावी घुमतोय बालमावळ्यांचा आवाज!

Next

कऱ्हाड : शाळेतून वेळ काढून महामोर्चाच्या तयारीला लागलेले बालमावळे सध्या गावागावांत दिसत आहेत. या बालमावळ्यांचा दिनक्रमच घोषणांनी सुरू होत असून, रात्र नियोजन बैठकीने पूर्ण होत आहे. दि. ३ आॅक्टोबर रोजी सातारा येथे आपल्या घरातील मोठ्यांसह जाण्याचा हट्टही हे बालमावळे करू लागले आहेत. मोठ्यांप्रमाणे बालमावळ्यांमध्येही मराठा महामोर्चाबाबत चांगलीच उत्सुकता जाणवत असल्याचे दिसत आहे.
मराठा आरक्षणाबाबत सर्व स्तरांतून मागणी होत असताना ग्रामीण भागात आरक्षण मागणीसाठी व काढण्यात येणाऱ्या महामोर्चाची जय्यत तयारी केली जात आहे. गाड्यांसह कोण कोण जायचे, किती कार्यकर्ते, महिलांना सोबत न्यायचे तसेच लहान मुलांची या दिवशी कशाप्रकारे काळजी घ्यायची अशा अनेक प्रकारचे नियोजन सध्या ग्रामीण भागात घराघरांमध्ये केले जात आहे. महामोर्चास तीन दिवस उरले असल्याने याची जय्यत तयारीही करण्यात आली आहे.
कऱ्हाड तालुक्यात लहान बालमावळेही या महामोर्चाला जाण्यासाठी वडीलधाऱ्यांकडे बालहट्ट करू लागले आहेत. ऐरव्ही या ना त्या कारणावरून हट्ट करणारे हे बालमावळे महामोर्चाला जाण्यासाठी सांगेल तसेच वागू लागले आहेत. आई-वडिलांकडून करण्यात येत असलेल्या सूचनांचे न चुकता पालन करत आहेत. तर दंगा मस्ती न घालता शाळेतील अभ्यास वेळच्या वेळी उरकून शांतही बसत आहेत. वेळच्या वेळी जेवण, झोप तसेच सांगेल तसे वागणारे हे बालमावळे आता चला साताऱ्याला असे एकमेकांना सांगताना दिसत आहेत. (प्रतिनिधी)


पाटण-मणदुरे विभागात आज दुचाकी रॅली
मणदुरे : सातारा येथे होणाऱ्या मराठा महामोर्चाचा प्रसार आणि प्रचार व जनजागृती यासाठी शुक्रवार, दि. ३० भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या दुचाकी रॅलीत मराठा युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मराठा महामोर्चा पाटण आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या भव्य दुचाकी रॅलीची सुरुवात पाटणमधील मारुती मंदिर रामापूर येथून सकाळी ९ वाजता होणार असून, पाटण नवीन बसस्थानक, जुना बसस्थानकमार्गे मणदुरे रस्त्याने, सुरूल, बिबी, साखरी, मेंढोशी, केरळ, मणदुरे, निवकणे, चाफोली, दिवशी, खिवशी, घाणव, चिटेघर, तामकणे, केर, कातवडी, पाटण बाळासाहेब देसाई महाविद्यालयमार्गे लायब्ररी चौक, झेंडा चौक, ग्रामपंचायत पाटण अशी काढण्यात येणार आहे.
या रॅलीत सहभागी होताना संयोजकांनी केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. प्रमुख मोठ्या भगव्या झेंड्याची गाडी सर्वात पुढे असणार आहे. त्या पाठोपाठ इतर सर्व गाड्या असतील. रॅलीत समाविष्ट दुचाकी चालकांनी मागे-पुढे करायचे नाही. रॅली शिस्तीने व दोन रांगेत पुढे जाईल. गाड्यांवर मराठा महामोर्चाचे स्टिकर व भगवे झेंडे असणे आवश्यक आहे. ज्या गावात रॅली पोहोचेल तेथे रॅलीचे स्वागत करून त्या गावातील दुचाकी चालकांनी रॅलीत सहभागी व्हायचे आहे. पाटणपासून रॅलीत सहभागी व्हायचे आहे त्यांनी सकाळी ९ ला मारुती मंदिर रामापूर येथे हजर राहावे, असे आवाहनही मराठा महामोर्चा पाटण यांच्या वतीने करण्यात आले आहे

बालमावळे मोर्चाच्या तयारीला
सातारा येथे ३ आॅक्टोंबर रोजी मराठा क्रांती मूक मोर्चा निघणार असल्याने या मोर्चाला जाण्यासाठी मोठ्यांप्रमाणे आता बालमावळेही सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे शाळेतून वेळ काढून हे बालमावळे या मोर्चाच्या तयारीला लागलेले दिसत आहेत. मोठ्यांप्रमाणे आपणही या मोर्चात धिडीडीने सहभागी व्हावे असे वाटत असल्याने सकाळी उठल्यापासून रात्री उशीरापर्यंत हे बालमावळे नियोजनाच्या बैठकीस उपस्थिती लावत आहेत. .

Web Title: Voluptuous voice of village!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.