वाधवान कुटुंब नाव बदलून राहिले लोणावळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 03:10 AM2020-04-15T03:10:52+5:302020-04-15T03:11:15+5:30
महाबळेश्वर पोलिसांच्या चौकशीतून झाले स्पष्ट
महाबळेश्वर : पाचगणी येथे इन्स्टिट्यूट क्वारंटाईन केलेले एस बँक घोटाळ्यातील संशयित प्रसिद्ध उद्योगपती वाधवान बंधूंची चौकशी करण्यासाठी महाबळेश्वर पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी यांच्या नेतृत्वाखाल्ांी पोलिसांचे एक पथक नुकतेच लोणावळा येथे गेले होते. त्यांच्या चौकशीची एक फेरी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये वाधवान कुटुंब नाव बदलून राहिल्याची आश्चर्यकारक माहिती समोर आल्याचे समजते. मात्र, तपास पूर्ण झाल्यानंतरच याबाबतची माहिती देण्यात येणार आहे. दरम्यान, चौकशी पथकाला क्वारंटाईन कक्षात प्रवेश नाकारण्यात आल्याने सखोल चौकशीसाठी २३ एप्रिलची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
गृहविभागाचे सचिव अमिताभ गुप्ता यांच्या पत्राचा आधार घेऊन एस बँक घोटाळ्यातील संशयित उद्योगपती वाधवान यांनी कुटुंब आणि २३ जणांसह लोणावळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला होता. याप्रकरणी त्यांच्यावर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याच्या चौकशीसाठी पोलिसांचे एक पथक वाधवान बंधू हे लोणावाळ्याच्या ज्या भागात राहिलेले त्या भागात चौकशी करून नुकतेच परत आले.
महाबळेश्वर पोलीसांचे तपास
पथक लोणावळ्याजवळील तुंगार्ली पिकॉक व्हॅली या सोसायटीत पोहोचले. याच सोसायटीतील दोन बंगले वाधवान यांनी भाड्याने घेतले होते. हे दोन्ही बंगले मुंबईच्या एका धनिकाचे असून, ते भाड्याने दिले जातात. याठिकाणचा केअर टेकर यांची चौकशी महाबळेश्वरच्या पोलीस पथकाने केल्याचे समजते.
प्रशासन अंधारात