Satara Crime: अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणाला सात वर्षे शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 15:44 IST2025-03-18T15:43:51+5:302025-03-18T15:44:11+5:30
सातारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अमोल अशोक खरात (वय २७, रा. कवठे, ता. वाई , जि. सातारा) याला ...

Satara Crime: अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणाला सात वर्षे शिक्षा
सातारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अमोल अशोक खरात (वय २७, रा. कवठे, ता. वाई, जि. सातारा) याला वाईन्यायालयातील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांनी सात वर्षे शिक्षा व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद, अशी शिक्षा सुनावली.
आरोपी अमोल खरात याने १९ मार्च २०१३ रोजी पीडित अल्पवयीन मुलीला उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. भुईंज पोलिस ठाण्यात त्याच्यावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक एन. व्ही. पवार यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले.
परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने अमाेल खरात याला सात वर्षे कैदेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता डी. एस. पाटील यांनी कामकाज पाहिले. भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली घोरपडे, आगम यांनी सरकार पक्षाला योग्य ती मदत केली.