वाई नगर परिषदेने साधला गृह अलगीकरणातील रुग्णांसोबत संवाद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:36 AM2021-04-19T04:36:45+5:302021-04-19T04:36:45+5:30

वाई : कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसोबतच गृह अलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांचे मनोबल वाढवून त्यांना योग्य मार्गदर्शन करणेही गरजेचे झाले ...

Wai Municipal Council conducts interaction with home separation patients! | वाई नगर परिषदेने साधला गृह अलगीकरणातील रुग्णांसोबत संवाद !

वाई नगर परिषदेने साधला गृह अलगीकरणातील रुग्णांसोबत संवाद !

Next

वाई : कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसोबतच गृह अलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांचे मनोबल वाढवून त्यांना योग्य मार्गदर्शन करणेही गरजेचे झाले आहे. ही गरज लक्षात घेत वाई नगर परिषदेने एक वेगळा प्रयोग यशस्वीरित्या पार पाडला. गृह अलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांच्या शंकांना उत्तरे आणि कोविडसंबंधी योग्य माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी रविवारी वाई नगरपालिकेमार्फत त्यांच्याशी थेट ‘झूम’द्वारे संवाद साधण्यात आला.

प्रत्येक कुटुंबाला एक ॲक्सेस देऊन जास्तीत जास्त रुग्ण सामावून घेत, नगराध्यक्ष आणि काही सदस्य, ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर यांच्यासमवेत चर्चा केली. अशाप्रकारचा अनोखा प्रयोग करणारी वाई ही पहिलीच नगर परिषद ठरली आहे. यावेळी रुग्णांशी संवाद साधताना ग्रामीण रुग्णालय, वाई येथील डॉ. देसाई यांनी रुग्णांना गृह अलगीकरणामध्ये असताना कोणती व कशी काळजी घ्यावी, औषधे कोणती घ्यावीत आणि कोणत्या परिस्थितीत रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे, याबद्दल मार्गदर्शन केले. याशिवाय रुग्णांच्या या रोगासंबंधीच्या शंकांचे निरसन करून त्यांची या रोगाबद्दलची भीती व गैरसमज दूर केले. यावेळी नगर परिषदेच्या सर्व सदस्यांनी रुग्णांशी संवाद साधला आणि प्रामुख्याने नगरपालिका त्यांची काळजी घेत असून, त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असा विश्वास दिला. तसेच या विदारक परिस्थितीत ‘आम्ही तुमच्यासोबत आहोत’ हे सांगण्याचा प्रयत्न करून या रुग्णांचे मनोबल वाढवले.

या अनोख्या उपक्रमाला गृह अलगीकरणातील रुग्णांनीही चांगला प्रतिसाद दिला. या संवाद कार्यक्रमाला वाई नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, नगराध्यक्ष डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक भारत खामकर, चरण गायकवाड, प्रदीप चोरगे, किशोर बागुल, दीपक ओसवाल, नगरसेविका रुपाली वनारसे, सुमैय्या इनामदार व ग्रामीण रुग्णालय, वाई येथील डॉ. देसाई, नगर परिषदेचे कार्यालय अधीक्षक नारायण गोसावी, आरोग्य निरीक्षक खोपडे, पाणीपुरवठा अधिकारी क्रांती वाघमळे, आदी उपस्थित होते.

(चौकट )

रुग्णांना दिला आत्मविश्वास

दवाखान्यात बेड आहे का? औषधे, रेमडेसिविर मिळेल का? याचा विचार करायचाच नाही तर घरीच योग्य ते औषधोपचार आणि आहार घेऊन लवकर यातून बरे व्हायचे आहे. आपण किंवा आपल्या कुटुंबातील कोणीही व्यक्तीने कोणत्याही कारणाने घराबाहेर पडायचे नाही. आपल्याला सर्व गरजेच्या गोष्टी नगरपालिकेमार्फत घरपोच दिल्या जातील. आपले सर्व सदस्य आणि सर्व कर्मचारी हे कायम आपल्यासोबत आहोत, असे मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी सांगितले.

फोटो आहे...

Web Title: Wai Municipal Council conducts interaction with home separation patients!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.