दुर्गम भागातील रुग्णांसाठी वाई, खंडाळ्यासाठी रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:50 AM2021-04-30T04:50:01+5:302021-04-30T04:50:01+5:30
वाई : वाई तसेच खंडाळा ग्रामीण रुग्णालयासाठी आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून दोन रुग्णवाहिका प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या. वाई ...
वाई : वाई तसेच खंडाळा ग्रामीण रुग्णालयासाठी आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून दोन रुग्णवाहिका प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या.
वाई मतदारसंघात मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि दुर्गम भागातील रुग्णांना रुग्णालयात पोहोचविण्यात अडचणी येत आहेत. या रुग्णवाहिकांमुळे मोठी मदत होणार आहे.
दुर्गम व डोंगराळ भागातील रुग्ण उपचारासाठी वेळीच रुग्णालयात पोहोचू शकत नसल्यामुळे उपचारांमध्ये अडचणी येत होत्या. त्यामुळे आमदार मकरंद पाटील यांनी प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाला आमदार निधी व नियोजन मंडळातून रुग्णवाहिका देण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे दोन रुग्णवाहिका या प्रशासनाकडे दाखल करण्यात आल्या. त्यांचे पूजन आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर- चौगुले, तहसीलदार रणजित भोसले, दशरथ काळे, वाई गटविकास अधिकारी उदयकुमार कसुरकर, आरोग्य अधिकारी डॉ. संदीप यादव, डॉ. अविनाश पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी शशिकांत पिसाळ, प्रतापराव पवार, नितीन पाटील, प्रमोद शिंदे, माजी जिल्हा कृषी सभापती मनोज पवार, राजेंद्र तांबे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, उपसभापती भैया डोंगरे उपस्थित होते.