मालगाव, वनगळचे शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:28 PM2019-06-19T23:28:19+5:302019-06-19T23:30:39+5:30

धोम डाव्या कालव्याला ११ मार्च २०१९ रोजी भगदाड पडून सातारा तालुक्यातील मालगाव, वनगळ या दोन गावांतील ५९ शेतकऱ्यांच्या शेती तसेच शेतमालाचे मोठे नुकसान झाले होते. हे शेतकरी अजूनही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

Waiting for compensation for farmers in Malgaon, Deoghar | मालगाव, वनगळचे शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत

मालगाव, वनगळचे शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत

Next
ठळक मुद्देमार्च महिन्यापासून हेलपाटे : धोम डाव्या कालव्याला भगदाड पडल्याने ५९ खातेदारांची आर्थिक कोंडीशेतकºयांची विवंचना... भाग : १

सागर गुजर ।
सातारा : धोम डाव्या कालव्याला ११ मार्च २०१९ रोजी भगदाड पडून सातारा तालुक्यातील मालगाव, वनगळ या दोन गावांतील ५९ शेतकऱ्यांच्या शेती तसेच शेतमालाचे मोठे नुकसान झाले होते. हे शेतकरी अजूनही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

कालव्याला भगदाड पडून पाणी वनगळ व मालगावातील शेतात शिरले होते. तसेच विहिरींमध्ये गाळ भरला. शेतातील उभ्या पिकांचेही मोठे नुकसान झाले होते. महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात मालगावातील ४४ शेतकऱ्यांचे एकूण ७७ लाख ११ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले होते. तर वनगळमधील १५ शेतकºयांचे ५ लाख १६ हजार नुकसान झाले होते.

कालव्याला भगदाड पडून वाहिलेल्या पाण्यामुळे उकिरड्याचे शेतखत, हळद बियाणे, कडबा, जळण, हरभरा पीक, खते, सिमेंट पोती आदी वाहून गेले होते. तसेच विहिरींमध्ये गाळ साठला. विद्युत मोटारीही बंद पडल्या. अद्यापही हे शेतकरी या आपत्तीतून सावरलेले नाहीत.
या नुकसानीचे महसूल विभाग व पाटबंधारे विभागाकडून पंचनामे करण्यात आले होते. मात्र केवळ पंचनामे केले गेले, त्यानंतर चार महिने उलटून गेले तरी शेतकरी सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकºयांवर आलेल्या आपत्तीवर फुंकर घालण्याचे काम अद्याप झालेले नाही.

मालगाव ग्रामपंचायतीचे ११ लाखांचे नुकसान
या आपत्तीत मालगाव ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचे ११ लाखांचे नुकसान झाले. ओढ्यालगतची स्मशानभूमी वाहून गेली. सिमेंट पोती, बांधकामाच्या फळ्या वाहून गेल्या. मालगाव-शिवथर रस्त्यावरील भराव वाहून गेला. मालगाव-शिवथर मार्गावरील ओढ्यात पाईप वाहून पुलाला दोन्ही बाजूंना भगदाड पडले होते. हे नुकसान शासकीय खात्यामार्फत दुरुस्त करण्यात येऊ शकते, असा अहवाल महसूल खात्याने दिला होता.


दोन्ही गावांचे ८२ लाखांचे नुकसान
धोम धरणाच्या डाव्या कालव्याला भगदाड पडून वनगळ व मालगाव या दोन गावांतील शेतकºयांचे एकूण ८२ लाख रुपयांचे नकुसान झाले होते. यापैकी अनेक शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यापैकी काहींचा शेतीला पूरक असणारा दुग्धव्यवसाय आहे. कालवा फुटून अनेकांच्या वैरणीच्या गंजी वाहून गेल्या. उभी पिके वाहून गेली. यातून ते अजूनही सावरलेले नाहीत. शासनाच्या मालमत्तेमुळेच हे नुकसान झाले असून भरपाई मिळणे जरुरीचे आहे. सध्या त्या भागातील शेतकरी भरपाई वंचित आहे. अजून तेथील शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.
 

मालगाव आणि वनगळ या दोन्ही गावांतील नुकसानग्रस्त शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रयत्न सुरू आहेत. न्याय मिळेपर्यंत संघटना शांत बसणार नाही.
- राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी
 

शेतकरी उमेदीने पिके घेतात. शेणखत, बियाणे, जनावरांचा कडबा या गोष्टींचे नुकसान झाल्यानंतर शेतकºयांची काय अवस्था होते, हे शासकीय अधिकाºयांनी समजावून घ्यावे.
- अर्जुन साळुंखे, स्वाभिमानी नेते

Web Title: Waiting for compensation for farmers in Malgaon, Deoghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.