फणसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:28 AM2021-05-31T04:28:24+5:302021-05-31T04:28:24+5:30

सातारा : साताऱ्यात दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर फणसांची आवक होत असते. यंदा मात्र लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांना साताऱ्यात येता आले ...

Waiting for the fox | फणसाची प्रतीक्षा

फणसाची प्रतीक्षा

Next

सातारा : साताऱ्यात दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर फणसांची आवक होत असते. यंदा मात्र लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांना साताऱ्यात येता आले नाही. त्यामुळे फणस नागरिकांना खाता आले नाहीत. अनेकांना त्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

0000000

वाहतूक कोंडी

सातारा : शहरातील तांदूळ आळी, चांदणी चौक व खण आळी या परिसरात वाहतुकीची सतत कोंडी होत आहे. अनेक खासगी तसेच मालवाहतूक करणारी वाहने रस्त्याकडेला लावली जात असल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे. याचा पादचाऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांच्या वाहतूक शाखेने अशा वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

99999999

अनेक शहरांमध्ये बेकायदा बांधकामे

सातारा : सातारा जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये अनधिकृत बांधकामांना उधाण आले आहे. शहर परिसरातील बेकायदेशीर बांधकामांचे प्रमाण वाढत चालले आहे. या बेकायदेशीर बांधकामांची चौकशी व्हावी, अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे संबंधित पालिकांनी वेळीच कारवाई करून दंड वसूल करावा, अशी मागणी केली जात आहे.

00000000

तलाव स्वच्छतेची गरज

सातारा : साताऱ्यातील मंगळवार तळ्यातील मासे काही महिन्यांपूर्वी मेले होते. पाण्यातील ऑक्सिजन कमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते. आता पावसाळा काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे तळ्यात आणखी पाणी वाढणार आहे. त्यामुळे तळ्याची स्वच्छता करावी, अशी मागणी केली जात आहे.

००००००

सापांच्या संख्येत वाढ

सातारा : सातारा शहरासह परिसरात अधूनमधून पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरालगत असलेल्या ओढ्यांमध्ये सापांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सर्वसाधारणपणे धामण जातीचे साप आढळत आहेत. ते बिनविषारी असले तरी ते दिसायला लांबच लांब असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

000000

फळ विक्रेत्यांकडून प्लास्टिकचा वापर

सातारा : कडक निर्बंध लादलेले असले तरी काहीजण गल्लीबोळातून फळ, भाजीची विक्री करतात. प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असली, तरी सातारा शहरातील अनेक फळविक्रेते प्लास्टिक पिशव्यांचा चोरी-छुपे वापर करत आहेत. पालिका कर्मचाऱ्यांच्या धडक कारवाईत सातत्य नसल्याने विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर व विक्री केली जात आहे.

00000000

नाल्यांची दुरवस्था

शिरवळ : येथील रस्त्याकडेला असणाऱ्या गटारांची दुरवस्था झाली आहे. मोठ्या प्रमाणात गटारावर गवत वाढले असून, कचरा साचला आहे. गटारातील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येत आहे. गटारात साचणारा कचरा काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. गटारांची वेळीच दुरुस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

00000000

चहा टपऱ्यांवर गर्दी

सातारा : कडक लॉकडाऊन असल्याने साताऱ्यातील सर्वच हॉटेल बंद आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर जावे लागत असल्याने त्यांची गैरसोय होत आहे. ठराविक ठिकाणची चहाटपरी उघडी असते. ऑर्डर मिळाली तरच चहा घेऊन ते येतात. मात्र, त्यासाठी जास्त प्रमाणात मागणी असण्याचीही अपेक्षा व्यक्त करतात.

०००००००

वह्या-पुस्तके मिळेनात

सातारा : जिल्ह्यातील शाळा कोरोनामुळे बंद करण्यात आल्या होत्या. उन्हाळी सुट्टी सुरू असली तरी पालकांना शाळा पुन्हा कधी सुरू होणार, याची चिंता सतावत आहे. त्यामुळे काहीजण शाळेत जाऊन चौकशी करत आहेत. पुढील वर्गातील पुस्तकेही उपलब्ध नसल्याने मुलांना काय शिकवायचे ही अडचण आहे.

००००००

ब्रम्हपुरीतील स्मशानभूमी हिरवाईनं नटली

सातारा : रहिमतपूरपासून काही अंतरावर कृष्णा नदीच्या काठावर ब्रह्मपुरी येथे स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीच्या सभोवताली मोठ्या प्रमाणावर झाडी असल्याने हा परिसर हिरवाईने नटला आहे. रहिमतपूर पालिकेने तीन वर्षांपूर्वी स्मशानभूमीच्या सभोवताली झाडे लावली होती. त्यातच कृष्णा नदीतून पाणी मिळत असल्याने झाडांची वाढ चांगली झाली आहे. अनेकदा तरुण या परिसरात फोटो, चित्रीकरण करण्यासाठी येत असतात.

३० रहिमतपूर

-----------

वेगळा आडवा फोटो

शेंगा काढण्याची लगबग वाढली

साताऱ्यातील परळी भागात उन्हाळी भुईमुगाच्या शेंगा काढणीला वेग आला आहे. शेंगाचा डहाळा मोठ्या प्रमाणावर उपटून ते एका ठिकाणी गोळा केले जातात अन् त्यानंतर सावलीत बसून त्या तोडल्या जात आहेत. (छाया : जावेद खान)

३० शेंगा

Web Title: Waiting for the fox

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.