कोल्हापूर नाका उड्डाण पुलाच्या प्रतीक्षेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:43 AM2021-09-25T04:43:15+5:302021-09-25T04:43:15+5:30

मलकापूर : कोल्हापूर नाक्यावर महामार्गावरील अवजड वाहतुकीसह शहरातील वाहतूक एकाच जागेवरून ये-जा करत असल्यामुळे या ठिकाणी क्षणा-क्षणाला मृत्यू घोंगावत ...

Waiting for Kolhapur Naka flyover! | कोल्हापूर नाका उड्डाण पुलाच्या प्रतीक्षेत!

कोल्हापूर नाका उड्डाण पुलाच्या प्रतीक्षेत!

Next

मलकापूर : कोल्हापूर नाक्यावर महामार्गावरील अवजड वाहतुकीसह शहरातील वाहतूक एकाच जागेवरून ये-जा करत असल्यामुळे या ठिकाणी क्षणा-क्षणाला मृत्यू घोंगावत आहे. पुणे-बेंगलोर आशियायी महामार्गाच्या मलकापुरातील उड्डाण पुलाचे काम रखडल्याने आतापर्यंत झालेल्या अपघातांत अनेकजण जखमी झाले. या महामार्ग सहापदरीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

कऱ्हाडसह मलकापूर शहरात तालुक्यातून व महामार्गावरून दररोज ये-जा करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, कोल्हापूर नाक्यावर महामार्गावरील अवजड वाहनांसह प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. या ठिकाणी गर्दीतून मार्ग काढत महामार्गावरून कऱ्हाडमध्ये प्रवेश करताना वाहनधारकांसह प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच प्रवेश करावा लागतो. कोल्हापूरकडून पुणे बाजूकडे जाण्यासाठी असलेल्या लेनवर उड्डाण पूल नसल्यामुळे कऱ्हाड शहरात येणारी वाहने व पुढे सातारा तसेच पुणे, मुंबईकडे जाणारी वाहने एकाच लेनवरून धावत असतात. महामार्गावर सातारा, पुणे बाजूकडे जाणारी वाहने भरधाव वेगात असतात, तर शहरात येणाऱ्या वाहनांचा वेग मंदावलेला असतो. अशा परिस्थितीत अनेकवेळा अपघात घडले आहेत. यापुढेही उड्डाण पुलाच्या प्रतीक्षेत आणखी किती जणांना जीव गमवावा लागेल, असा संतप्त सवाल नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

चौकट

उड्डाण पुलाला निधी मंजूर; पण काम कधी?

मलकापुरातील उड्डाण पुलासाठी दहा वर्षांपूर्वी भूगर्भातील थर परीक्षण केले. परीक्षण हे परीक्षणच राहिले. त्याचे पुढे काय झाले, हे आजही प्रलंबितच आहे. तसेच महामार्ग प्राधिकरणासह विविध विभागांकडून अनेकवेळा पाहणी करून आराखडे तयार केले. सर्वांच्या प्रयत्नाने निधीही मंजूर झाला; पण हे काम प्रत्यक्षात केव्हा सुरू होणार याची प्रतीक्षा आजपर्यंत संपलेली नाही.

२४ मलकापूर

कोल्हापूर नाक्यावर महामार्गाच्या उड्डाण पुलाचे काम रखडल्यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते.

240921\img_20190519_185540.jpg

फोटो कॕप्शन

कोल्हापूर नाक्यावर महामार्गाच्या उड्डाणपूलाचे काम रखडल्यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत आसते.(छाय माणिक डोंगरे)

Web Title: Waiting for Kolhapur Naka flyover!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.