रहिमतपूर पोलीस ठाण्याला प्रतीक्षा कारभाऱ्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:38 AM2021-03-16T04:38:44+5:302021-03-16T04:38:44+5:30

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर पोलीस ठाण्यातील प्रमुख असलेले सहायक पोलीस निरीक्षक पद बारा दिवसांपासून रिक्त आहे. त्यामध्येच कर्मचाऱ्यांची ...

Waiting for Rahimatpur police station | रहिमतपूर पोलीस ठाण्याला प्रतीक्षा कारभाऱ्याची

रहिमतपूर पोलीस ठाण्याला प्रतीक्षा कारभाऱ्याची

googlenewsNext

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर पोलीस ठाण्यातील प्रमुख असलेले सहायक पोलीस निरीक्षक पद बारा दिवसांपासून रिक्त आहे. त्यामध्येच कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने रहिमतपूर पोलीस ठाणे कारभाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे.

रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे चाळीस गावांचा समावेश होतो.

रहिमतपूर नगरपरिषदेच्या हद्दीतील लोकसंख्या सुमारे वीस हजारांच्या आसपास आहे. यामध्ये नहरवाडी, ब्रह्मपुरी, कोंढवली व परतवडी या गावांचा समावेश होतो. पोलीस ठाण्याच्या हद्दीत साप, वाठार किरोली, तारगाव, अपशिंगे, कण्हेरखेड, शिरंबे, आर्वी आदी मोठी गावे येतात. यासह लहान गावे व वाड्या-वस्त्या असल्याने या ठिकाणी दररोज किरकोळ किरकोळ घटना घडत असतात. रहिमतपूर-सातारा या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू असून, रहिमतपूर-औंध रस्त्याचे नुकतेच डांबरीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात घडत आहेत.

रहिमतपूर परिसरातील काही गावांत अजूनही कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणारे, दुचाकीवरून विनामास्क उंडारणारे व लग्नासह इतर सोहळ्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून जास्त गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करणेही गरजेचे आहे. मार्च एंडिंग असल्यामुळे वेगवेगळे कर, थकीत कर्ज आदी वसुलीसाठी अनेक ठिकाणी कारवाया सुरू आहेत. या परिस्थितीत काही घटना घडल्या, तर ऑन दी स्पॉट ठोस निर्णय घेणे गरजेचे असते. यासाठी पोलीस ठाण्यातील कारभाऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरत असते. त्यामध्येच रहिमतपूर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रमुख अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता बळावते.

तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांची पदोन्नती झाल्याने ते मुंबईला चार मार्च रोजी रवाना झाले आहेत. तेव्हापासून रहिमतपूर पोलीस ठाण्याचा कारभार नुकतेच पदोन्नती मिळालेले पोलीस उपनिरीक्षक प्रमोद सावंत पाहत आहेत. तेही नवीन असल्यामुळे अचानक निर्माण झालेल्या घटना हाताळताना अडचणीचे ठरू शकते. सध्याच्या परिस्थितीचा वरिष्ठांना सर्वांगीण विचार करणे गरजेचे बनले आहे.

चौकट :

रहिमतपूर पोलीस ठाणे हद्दीत सध्या शांतता नांदत आहे. यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनीही शांतता कायम राखली होती. परंतु अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. रहिमतपूर पोलीस ठाण्यासाठी दहाजण रेसमध्ये असल्याची चर्चा आहे. यातीलच एक डॅशिंग अधिकारी पोलीस अधीक्षकांनी रहिमतपूरला पाठविण्याची मागणी होत आहे.

फोटो : १५रहिमतपूर-पोलीस ठाणे

रहिमतपूर पोलीस ठाण्यात कारभारीच नाहीत.

Web Title: Waiting for Rahimatpur police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.