वक्फ बोर्डाकडून जिल्ह्यात नऊ हजार वृक्षांचे रोपण--खुसरो खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 12:02 AM2019-09-26T00:02:03+5:302019-09-26T00:03:48+5:30

सातारा येथील गेंडामाळ कब्रस्तान येथे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. शासनाने वक्फ बोर्डाला दिलेल्या तीन लाखांच्या उद्दिष्टातील आजअखेर जवळपास दोन लाख वृक्ष लागवड झाली आहे. तसेच राहिलेल्या एक लाखाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संपूर्ण विभाग काम करत आहे.

Wakf Board to plant nine thousand trees in the district - | वक्फ बोर्डाकडून जिल्ह्यात नऊ हजार वृक्षांचे रोपण--खुसरो खान

सातारा येथील गेंडामाळ कब्रस्तानमध्ये वक्फ बोर्डाकडून वृक्षारोपण करण्यात आले.

Next
ठळक मुद्देलागवडीसाठी कब्रस्तानची निवड; तीन लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट

सातारा : ‘चालू वर्षी शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमांतर्गत वक्फबोर्ड मायनोरिटी विभागाला ३ लाख झाडांचे उद्दिष्ट दिले आहे. यातील सातारा जिल्ह्यात आठ हजार सातशे वृक्षांचे रोपण करण्याचे काम चालू आहे,’ अशी माहिती प्रादेशिक वक्फ अधिकारी पुणे विभागाचे अधिकारी खुसरो खान यांनी दिली.

सातारा येथील गेंडामाळ कब्रस्तान येथे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. शासनाने वक्फ बोर्डाला दिलेल्या तीन लाखांच्या उद्दिष्टातील आजअखेर जवळपास दोन लाख वृक्ष लागवड झाली आहे. तसेच राहिलेल्या एक लाखाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संपूर्ण विभाग काम करत आहे.

साताऱ्यातील गेंडामाळ, करंजे आणि सदर बझार येथील कब्रस्तानमध्ये वृक्षारोपण करण्याचे काम सुरू असून, दोन दिवसांत या परिसरात हजाराहून अधिक वृक्षारोपण करण्यात आले आहे. तसेच सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी वक्फची प्रॉपर्टी असलेल्या जागेवर हे वृक्षारोपण करणार असल्याचे खान यांनी सांगितले.

दरम्यान, मागील वीस वर्षांपासून गेंडामाळ कब्रस्तान जागेवर पालिकेने बागेचे केलेल्या आरक्षणाविषयी येथील अ‍ॅक्शन कमिटीने वेळोवेळी दखल घेत हे आरक्षण उठविल्याने खुसरो खान यांनी या कमिटीचे कौतुक केले. तसेच सातारा जिल्ह्यातील मशीद, कब्रस्तान, दर्गाबाबत कागदोपत्री काही अडीअडचणी असल्यास त्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
वृक्ष लागवडीसाठी पुणे विभागाचे हुसेन पठाण, नगरसेवक अल्लाऊद्दीन शेख, अ‍ॅक्शन कमिटी चेअरमन आरिफ शेख, इरफान बागवान व ट्रस्टी आणि सदर बझार येथील सलीम मेमन, सादीक बेपारी, लतिफ चौधरी, रज्जक घोणे, सलीम बेपारी, कमरुद्दीन जमादार आदी नागरिक उपस्थित होते.

शासनाचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व कब्रस्तानला भेटी देऊन सर्व्हे करून त्यामध्ये जागा उपलब्ध करून घेतली आहे. त्यामुळे या वृक्ष लागवडीचा नागरिकांबरोबर पर्यावरणालाही लाभ होणार आहे.
- खुसरो खान, प्रादेशिक वक्फ अधिकारी, पुणे विभाग पुणे

सातारा येथील गेंडामाळ कब्रस्तानमध्ये वक्फ बोर्डाकडून वृक्षारोपण करण्यात आले.

Web Title: Wakf Board to plant nine thousand trees in the district -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.