साताऱ्याला चला; पण हायवेला उतरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:03 AM2018-10-02T00:03:18+5:302018-10-02T00:03:22+5:30

Walk to Saturn; But landed highway | साताऱ्याला चला; पण हायवेला उतरा

साताऱ्याला चला; पण हायवेला उतरा

googlenewsNext

जगदीश कोष्टी।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : स्वारगेट बसस्थानकातून सांगली, कोल्हापूर, कोकणात जाणाºया एसटी गाड्यांचे वाहक ‘सातारा, सातारा...’ असे ओरडत असतात. त्यांची गाडी साताºयात आल्यानंतर सातारा बसस्थानकासाठी शहरात न येता महामार्गावरच उभी केली जाते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुणे आणि कोल्हापूर या दोन मोठ्या शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी सातारा आहे. तसेच पुण्याहून कोकणात जाणाºया गाड्याही साताºयातून जात असतात. त्यामुळे सातारा मध्यवर्ती बसस्थानकात एसटीची मोठी वर्दळ असते. दिवसभर एकाच वेळी तीन-चार गाड्या उभ्या असतात. त्याचप्रमाणे राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा आगारातर्फेही विना थांबा सेवा पुरविली जाते. त्यामुळे सातारकरांची खूपच चांगली सोय होत असते.
असंख्य सातारकर शैक्षणिक, व्यवसायाच्या निमित्ताने दररोज पुण्याला जात असतात. दिवसभर काम करून ते रात्री साताºयाला येण्यासाठी स्वारगेट बसस्थानकात येतात. तसेच अहमदनगरकडून रात्री साताºयाला येण्यासाठी सोय नसल्याने सातारकरांना पुणेमार्गे यावे लागते. ही मंडळीही शिवाजीनगर बसस्थानकातून स्वारगेटला येतात.
स्वारगेट बसस्थानकात रात्री दहानंतर विनाथांबा गाडी बंद झालेली असते. त्यामुळे प्रवाशांना इतर विभागांच्या गाड्यांवर अवलंबून राहावे लागते. सांगली, कोल्हापूर, चिपळूण, रत्नागिरी या गाड्या मोठ्या संख्येने तेथे उभ्या असतात. या गाड्यांमधील वाहकही ‘चला सातारा, साताराऽऽऽ’ असे ओरडतात. त्यामुळे प्रवासी धावत येऊन गाडीत बसतात. काही गाड्यांचे वाहकही गाडी गावात जाणार नसल्याचे सांगतात; पण बहुतांश वाहक याची पूर्वकल्पना देत नाहीत.
एसटी सुरू झाल्यानंतर स्वारगेट बसस्थानक सोडून गाडी मार्गस्थ झाल्यानंतर तिकीट काढण्यासाठी ते जवळ येतात. तेव्हा ‘गाडी आत जाणार नाही, हाय-वेला उतरावे लागेल.’ असे सांगतात. स्वारगेट बसस्थानक सोडलेले असते. त्यामुळे अर्ध्यावर उतरूनही फायदा होत नसल्याने विचार करून प्रवासी ठिक आहे म्हणून नाईलाजाने साताºयात येतात; पण येथे आल्यावर त्यांना वाढेफाटा किंवा बॉम्बे रेस्टॉरंट चौकात उतरावे
लागते.
नातेवाइकांना घ्यावे लागते बोलावून
महामार्गावर उतरल्यानंतर साताºयात किंवा घरी जाण्यासाठी नातेवाइकांना दुचाकी घेऊन बोलावून घ्यावे लागते. त्यानंतरच ते घरी जाऊ शकतात. परंतु तिकीट काढून मनस्ताप सहन करावा लागत असल्याने असंतोष व्यक्त होत आहे.

Web Title: Walk to Saturn; But landed highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.