प्रति पंढरी करहरमध्ये वारकऱ्यांचा मेळा

By admin | Published: July 4, 2017 10:49 PM2017-07-04T22:49:49+5:302017-07-04T22:49:49+5:30

प्रति पंढरी करहरमध्ये वारकऱ्यांचा मेळा

Warkaris Mela per Pandari Karhar | प्रति पंढरी करहरमध्ये वारकऱ्यांचा मेळा

प्रति पंढरी करहरमध्ये वारकऱ्यांचा मेळा

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सायगाव : प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जात असलेल्या जावली तालुक्यातील करहरनगरीत लाडक्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीला मंगळवारी लाखो वारकऱ्यांचा मेळा जमला होता.
आमदार शशिकांत शिंदे व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सपत्नीक सकाळी सात वाजता पांडुरंगाची महापुजा करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सभापती अरुणा शिर्के, बाजारसमिती संचालक राजुशेठ गोळे मान्यवर उपस्थित होते.
ग्यानबा तुकारामऽऽऽ’च्या गजरात प्रत्येक वारकऱ्याने आपल्या खांद्यावर भगवी पताका घेऊन विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. तालुक्यासह जिल्ह्यातून लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सुमारे चार तास रांगेत उभे राहूनही त्यांच्या मुखावर पांडुरंगाचे दर्शन घेतल्याचे समाधान दिसत होते. रात्री आठ वाजेपर्यंत भाविकांनी आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेतले.
परिसरातील काटवली, बेलोशा, दापवडी, खिंगर, राजपुरी, इंदवली, करंदी, कुडाळ, म्हसवे, सरताळे, सायगाव या ठिकाणाहून आलेल्या वारकरी मंडळांच्या दिंड्याही येथे सहभागी झाल्या होत्या.
यावेळी शिवसेनेचे जावळी-सातारा विधानसभा संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, ग्राहक संरक्षण कक्षाचे संपर्कप्रमुख अशोक पवार, नामदेव वेंदे, शंकर सणस, उद्योजक दादासाहेब कासुर्डे यांच्या वतीने तर पाचवड-करहर-पाचगणी जीप चालक-मालक संघटनेच्या वतीने भाविकांना फळांचे वाटप करण्यात आले.
वसंतराव मानकुमरे सहकारी पतसंस्था, ज्ञानशक्ती सहकारी पतसंस्था, छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था, जावली पंचायत समितीचे उपसभापती दत्ता गावडे यांच्या मार्फत व निरंजना प्रतिष्ठान यांच्या वतीनेही भाविकांना फळांचे वाटप करण्यात आले.
भाविकांसाठी गैरसोय टाळण्यासाठी देवस्थानतर्फे उपाययोजना केल्या होत्या.
विशेष मुलंही वारकऱ्यांच्या वेशात
काटवलीपासून पायी दिंडीस सुरुवात करून करहरपर्यंत भावकांनी पायी दिंडी काढली होती. हुमगाव, हातगेघर, आखाडे, काटवली, बेलोशी, खर्शिबारामुरे या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या चित्ररथांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले. तर वाई तालुक्यातील पाचवड येथील आपुलकी मतिमंद शाळेच्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशात काढलेली पायी दिंडी सगळ्यांचे आकर्षण ठरले.

Web Title: Warkaris Mela per Pandari Karhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.