फलटणमध्ये बेकायदेशीर बांधकामप्रकरणी आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:26 AM2021-06-28T04:26:25+5:302021-06-28T04:26:25+5:30

फलटण : फलटण नगरपालिकेकडून नव्याने बांधण्यात आलेल्या राजधानी टॉवरमधील बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमण न हटविल्याच्या निषेधार्थ सोमवारपासून सर्व ...

Warning of illegal construction in Phaltan | फलटणमध्ये बेकायदेशीर बांधकामप्रकरणी आंदोलनाचा इशारा

फलटणमध्ये बेकायदेशीर बांधकामप्रकरणी आंदोलनाचा इशारा

Next

फलटण : फलटण नगरपालिकेकडून नव्याने बांधण्यात आलेल्या राजधानी टॉवरमधील बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमण न हटविल्याच्या निषेधार्थ सोमवारपासून सर्व विरोधी नगरसेवकांसह मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा विरोधी नगरसेवकांनी दिला आहे.

याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे देण्यात आले आहे. याप्रसंगी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर, गटनेते अशोक जाधव, सचिन अहिवळे, डॉ. प्रवीण आगवणे उपस्थित होते.

फलटण नगरपालिकेकडून नव्याने बांधण्यात आलेल्या राजधानी टॉवरमधील बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमणाबाबत आंदोलनाची नोटीस दि. १ जून रोजी आम्ही दिली होती. त्यावर मुख्याधिकाऱ्यांनी २० दिवसांत संबंधित कार्यालयाची परवानगी न मिळाल्यास कारवाई करू, असे आश्वासन दिले होते.

याबाबत मुख्याधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता सहायक संचालक नगररचना, सातारा यांनी दि. १८ जून रोजीच्या पत्राने बांधकामास परवानगी दिली असल्याचे मुख्याधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यानंतर दि. २३ जून रोजी सहायक संचालक, नगररचना, सातारा यांनी दि. १८ जून रोजी दिलेली परवानगी रद्द समजण्यात यावी, असे पत्र मुख्याधिकाऱ्यांना व आम्हांला दिले आहे. त्यावरून बांधकाम हे बेकायदा असल्याचे सिद्ध होत असून, ते न हटविल्याने उद्या, सोमवारपासून सर्व विरोधी नगरसेवक फलटण पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात बांधकाम काढले जात नाही, तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलनास बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Warning of illegal construction in Phaltan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.