मुस्लीम बांधवांचा जलसमर्पणाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:38 AM2021-03-21T04:38:40+5:302021-03-21T04:38:40+5:30
निवेदनात म्हटले आहे की, ११ डिसेंबर १९६७ रोजी झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर पाटण तालुक्यातील हेळवाक येथे मुस्लीम बांधवांना जागा देण्यात ...
निवेदनात म्हटले आहे की, ११ डिसेंबर १९६७ रोजी झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर पाटण तालुक्यातील हेळवाक येथे मुस्लीम बांधवांना जागा देण्यात आली. वर्षानुवर्ष संबंधित समाजाचे लोक याचा वापर करत असून शासनाचा करही भरत आहेत. संबंधितांच्या नागरी सुविधांच्या कामांसाठी स्थानिकांचा जाणीवपूर्वक विरोध होत असल्याने हा समाज सेवा सुविधांपासून वंचित राहत आहे. प्रशासनाने याबाबत ठोस भूमिका घेऊन न्याय द्यावा. अन्यथा २५ मार्चला आम्ही स्थानिक सर्व मुस्लीम समाज आपल्या कुटुंबीयांसह कोयना नदीपात्रात जलसमर्पण करून आपले आयुष्य संपवणार आहे. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल. या निवेदनावर वसाहतीतील ग्रामस्थांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा पोलीसप्रमुख, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक आदींना देण्यात आल्या आहेत.