नारायण राणेंच्या पत्नीसह ३३ जणांविरुद्ध वॉरंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 04:13 AM2018-07-24T04:13:57+5:302018-07-24T04:14:05+5:30
बेकायदा बांधकाम केलेल्या ३३ मिळकतधारकांना अटक वॉरंट बजावण्यात आले आहे
Next
महाबळेश्वर (जि. सातारा) : राष्ट्रीय हरित लवादाच्या फरिदाबाद न्यायालयाने महाबळेश्वर तालुक्यातील खासगी मालकीच्या वनसदृश मिळकतीमध्ये बेकायदा बांधकाम केलेल्या ३३ मिळकतधारकांना अटक वॉरंट बजावले. यामध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलिमा राणे यांचा समावेश आहे.
केंद्र शासनाने महाबळेश्वर तालुका हा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करुन बांधकामाप्रमाणेच वन अधिनियमाची नियमावली तयार केली आहे. असे असतानाही संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून धनिकांनी ही बांधकामे सुरू ठेवली आहेत.