योद्धे कोण आज स्पष्ट होणार!

By admin | Published: February 12, 2017 10:40 PM2017-02-12T22:40:27+5:302017-02-12T22:40:27+5:30

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक

The warriors who will be clear today! | योद्धे कोण आज स्पष्ट होणार!

योद्धे कोण आज स्पष्ट होणार!

Next



सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत बंडखोरी रोखण्यासाठी राष्ट्रवादी, काँगे्रस, भाजप व शिवसेना या पक्षांच्या नेतेमंडळींनी आठवडाभरापासून जोरदार प्रयत्न केले. रविवारी रात्री उशिरापर्यंत अनेकांची मनधरणी करण्याचे काम सुरू होते. याचा ‘आऊटपूट’ सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी पाहायला मिळणार आहे.
निवडणुकीची दंगल सुरू झाली असतानाच भाजपने राष्ट्रवादी व काँगे्रसमधील नाराजांसाठी जिल्हाभर रथ फिरविला. या रथात राष्ट्रवादी व काँगे्रसचे अनेकजण बसले. भाजपने तिकिटे देऊन त्यांना ‘अधिकृत’ करून घेतले. काहींना भविष्यातील मोठी आश्वासनेही देण्यात आली आहेत. उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागेल, या भीतीने अनेकजण ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत.
अनिल देसाई, अमित कदम, सचिन गुदगे, सह्याद्री कदम, माजी खासदार गजानन बाबर, दिनकर शिंदे, प्रभाकर साबळे ही मंडळी कार्यकर्त्यांसोबत भाजपमध्ये दाखल झाली. यापैकी बहुतांश मंडळींना अथवा त्यांच्या कार्यकर्त्यांना भाजपने उमेदवारी देऊ केली आहे.
दोन्ही काँगे्रसमधील नाराज मंडळी उमेदवारी अर्ज कायम ठेवून आहेत. या नाराजांची मनधरणी करण्याचे काम गेल्या आठवडाभरापासून सुरू आहे. राष्ट्रवादीने आपल्या आमदारांकडे याची जबाबदारी सोपवली आहे. काँगे्रसही स्थानिक नेतृत्वाच्या माध्यमातून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. यात कितपत यश आले आणि निवडणुकीत योद्धे कोण असणार, हेही आज स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)
.
पुरस्कृतचे अभ्यंगस्नान
काही जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये अपक्षांना पुरस्कृत करून घेण्याच्या हालचाली सर्वच पक्षांनी सुरू ठेवल्या आहेत. एबी फॉर्म दिलेली काही मंडळीही सध्या ‘गॅस’वर आहेत. आपले तिकीट कापले जाऊ नये, यासाठी ही मंडळी सावध आहेत. तर पुरस्कृतचे अभ्यंगस्नान घडलेली मंडळी कामाला लागली आहेत.

Web Title: The warriors who will be clear today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.