पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:18 AM2021-05-04T04:18:20+5:302021-05-04T04:18:20+5:30
रस्ता डांबरीकरण किडगाव : मोळाचा ओढा ते वर्ये या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना ...
रस्ता डांबरीकरण
किडगाव : मोळाचा ओढा ते वर्ये या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. समस्या गंभीर बनल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाच्या डांबरीकरणाचे काम नुकतेच पूर्ण केले असून, ग्रामस्थांसह वाहनधारकांची परवडही आता थांबली आहे.
धुळीमुळे अपघात
सातारा : साताऱ्यातील अनेक मार्गांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे माती वर आली आहे. त्यातूनच वाहने सुसाट धावत असतात. त्यामुळे अनेक भागांत धुळीचे प्रमाण वाढले आहे. दुचाकी वाहने चालविताना डोळ्यात धूळ जात असल्याने वाहने चालविणे अवघड होत आहे.
नागरिक त्रस्त
वाई : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून अनेक वाहनचालक रस्त्यावरच वाहने लावत आहेत. परिणामी वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. महागणपती घाटावरील जुन्या व नव्या पुलावर सकाळी वाहतुकीची कोंडी होत आहे.
बंदोबस्ताची मागणी
खटाव : खटावसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उपद्रव घातला असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही कुत्री ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांच्या तसेच वाहनधारकांच्या अंगावर धावून जात आहेत. पालिकेने भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
मोकाटांचा त्रास
सातारा : सातारा शहरात काही महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांबरोबरच गायींचाही वावर वाढला आहे. राजपथावरील शहर पोस्ट कार्यालयासमोर बसलेले असतात. त्यामुळे या मार्गावर वारंवार वाहतुकीची कोंडी होत असते. या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. काहीवेळा समोरच्या वाहनांमुळे जनावरे दिसत नसल्याने अपघात होतात.