वाठार रेल्वेस्थानकाची पाहणी
By admin | Published: December 19, 2014 09:15 PM2014-12-19T21:15:48+5:302014-12-19T23:34:33+5:30
महाप्रबंधकांची भेट : स्थानिकांनी समस्यांचे दिले निवेदन
वाठार स्टेशन : रेल्वेचे महाप्रबंधक सुनीलकुमार सूड यांनी शुक्रवारी वाठार स्टेशन स्थानकाची पाहणी केली. या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या मार्गावरील रेल्वे तसेच सातारा-लोणंद मार्गावरील देऊर रेल्वे गेट व वाठार रेल्वे स्थानकातील विविध कामांचे उदघाटन केले.
सुनीलकुमार सूड यांनी शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास रेल्वेने या परिसराची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहूल कदम, माधव भोईटे, भरतवडीचे सरपंच राजेंद्र दिसले यांनी देऊर येथे रेल्वे गेटवरुन उड्डाणपूल होण्याची तसेच माधव भोईटे यांनी रेल्वे हद्दीत शेतकऱ्यांच्या गेलेल्या जमिनीचे नुकसान भरपाईची मागणी निवेदनाद्वारे केली. महागावचे जिल्हा परिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी निवेदन दिले. याबाबत सूड यांच्याशी त्यांनी चर्चा केली.
वाठार रेल्वे स्थानकात सूड यांचे ग्रामस्थ तसेच रेल्वे कर्मचारी संघाने जल्लोषात स्वागत केले. यावेळी वाठार स्टेशनचे सरपंच अमोल आवळे यांनी वाठार रेल0वेत विविध गाड्या थांबवाव्यात, या मागणीचे निवेदन दिले. तसेच संजय भोईटे, इरफान इनामदार, शिवसेनेचे शामराव चव्हाण यांनीही निवेदन दिले. (वार्ताहर)