बनवडी ग्रामपंचायतीचा कचरा टाकणाऱ्यांवर वाॅच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:38 AM2021-03-16T04:38:13+5:302021-03-16T04:38:13+5:30
कोपर्डे हवेली : बनवडी (ता. कऱ्हाड) येथील ग्रामपंचायतीने गावाच्या हद्दीत कचरा टाकणाऱ्यांवर वाॅच ठेवला आहे. रविवारी सायंकाळी तर कचरा ...
कोपर्डे हवेली : बनवडी (ता. कऱ्हाड) येथील ग्रामपंचायतीने गावाच्या हद्दीत कचरा टाकणाऱ्यांवर वाॅच ठेवला आहे. रविवारी सायंकाळी तर कचरा टाकणाऱ्या अज्ञाताला पकडून त्याला दंड ठोठावला. सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच विकास करांडे, ग्रामविकास अधिकारी दीपक हिनुकले, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग कोठावळे यांनी रविवारी सायंकाळी सात वाजता ही मोहीम राबवली.
बनवडी ग्रामपंचायत ही शहरानजीक असल्याने याला महत्त्व आहे. येथे अनेक आज्ञात लोक कचरा गावाच्या हद्दीत टाकतात.त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. गावातील घनकचरा टाकण्यासाठी ग्रामपंचायत सुका व ओला कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावत आहे.
गावाबाहेरील दुकानदार, व्यावसायिक, तसेच अज्ञात लोक रात्रीचा कचरा येथे टाकतात. कऱ्हाड-मसुर रस्त्यावरील कडेला बनवडी गावाच्या हद्दीत कचरा टाकला जातो. वेळोवेळी ग्रामपंचायतीने कारवाईचे फलक लावले असले तरी उपयोग होत नसल्याने ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांनी ही मोहीम राबवली.
चौकट
रविवारी सायंकाळी ग्रामपंचायत सरपंच व त्यांच्या टीमने सातच्या दरम्यान गावाच्या हद्दीत कचरा टाकणाऱ्यास पकडले. त्याला टाकलेला कचरा पुन्हा उचलायला लावला शिवाय दंडात्मक कारवाईही करण्यात आली. त्याची गावात चर्चा सुरू आहे.
(कोट)
बनवडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक जागांचे विद्रुपीकरण करणे या कलमाखाली कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वाॅच असणार आहे.
- दीपक हिनुकले
ग्रामविकास अधिकारी
फोटो ओळ :
बनवडी (ता. कऱ्हाड ) येथील गावाच्या हद्दीत रविवारी कचरा टाकणाऱ्याला कचरा पुन्हा भरायला लावला. यावेळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी...