पाणी अन् आरोग्य सेवा तुटीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:46 AM2021-03-01T04:46:34+5:302021-03-01T04:46:34+5:30

सातारा : महसूल वाढीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पाणी व आरोग्य या सेवा तुटीत असल्याचे अंदाजपत्रकातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ...

Water and health services in short supply! | पाणी अन् आरोग्य सेवा तुटीत !

पाणी अन् आरोग्य सेवा तुटीत !

Next

सातारा : महसूल वाढीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पाणी व आरोग्य या सेवा तुटीत असल्याचे अंदाजपत्रकातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पाणीसेवा १५८.२६ तर आरोग्य सेवा तब्बल ३७२.२१ टक्के तुटीत आहे. पालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत या विषयावर चर्चा होणे अपेक्षित होते; परंतु ऑनलाईनच्या गोंधळात या विषयावर चर्चाच झाली नाही.

शुक्रवारी झालेल्या पालिकेच्या विशेष सभेत उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी कोणतीही करवाढ नसणारे ३०७ कोटी ४७ लाख ६६ हजार ४२४ रुपयांचे अंदाजपत्रक सभागृहापुढे मांडले. हे अंदाजपत्रक सर्वानुमते मंजूर करण्यात आले. ऑलाईनमुळे कोणत्याही विषयावर तपशीलवार चर्चा करण्यात आली नसली तरी विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र, महसूल वाढीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पाणीपुरवठा व आरोग्य सेवेच्या तुटीबाबत कोणीही मत व्यक्त केले नाही.

पाणीपुरवठा सेवेपासून पालिकेला वार्षिक ३ कोटी ३९ लाख २४ हजार ८०८ रुपये उत्पन्न मिळते. मात्र, यंदा पाणीपुरवठा सेवेसाठी ८ कोटी ७६ लाख १५ हजार ५४२ रुपये जादा खर्च झाल्याची बाब समोर आली असून. पाणीपुरवठा सेवेवर उत्पन्नापेक्षा ५ कोटी ३६ हजार ९० हजार ७३४ रुपये जादा खर्च झाला असून, ही सेवा ही सेवा १५८.२६ टक्के तुटीत असल्याचे अर्थसंकल्पात नमूद केले आहे. त्याचप्रमाणे साफसफाई सेवेपासून पालिकेला २ कोटी ४५ लाख ८१ हजार २७९ रुपये उत्पन्न मिळते. मात्र, या सेवेवर तब्बल ११ कोटी ६० लाख ७५ हजार २४७ रुपये खर्च झाला आहे. उत्पन्नापेक्षा ९ कोटी १४ लाख ९३ हजार ९६८ रुपये जादा खर्च झाल्याने ही सेवा तब्बल ३७२.२१ टक्के तुटीत आहे.

२०१९-२० च्या अंदाजपत्रकानुसार ५५.८६ टक्के तुटील असलेली दिवाबत्तीची सेवा यंदा तुटीत नाही. या सेवेपासून पालिकेला १ कोटी २५ लाख ३५ हजार ३२५ रुपये उत्पन्न मिळते. यंदा या सेवेवर ९२ लाख २३ हजार ८४३ रुपये खर्च झाला आहे. उत्पन्नापेक्षा ३३ लाख ११ हजार ८३५ रुपये कमी खर्च झाल्याने ही सेवा तुटीत नसल्याचे अंदाजपत्रकात नमूद केले आहे.

लोगो : सातारा पालिकेचा फोटो

Web Title: Water and health services in short supply!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.