नारायणवाडी ग्रामपंचायतीचे वाॅटर एटीएम सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:29 AM2021-07-17T04:29:14+5:302021-07-17T04:29:14+5:30
स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी देण्यासाठी नवीन उपक्रम लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : नारायणवाडी ता. कऱ्डाड येथे १५ व्या ...
स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी देण्यासाठी नवीन उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : नारायणवाडी ता. कऱ्डाड येथे १५ व्या वित्त आयोग निधीतून ग्रामपंचायतीच्या वतीने वॉटर एटीएम सेंटर उभारण्यात आले आहे. १ हजार लीटर क्षमतेच्या या सेंटरचा शुद्ध पाण्यासाठी नारायणवाडी येथील ग्रामस्थांना लाभ घेता येणार आहे. या सेंटरचा ज्येष्ठ नागरिक व माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीरंग नलवडे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
यावेळी उपसरपंच रणजित देशमुख, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पाटील, जगन्नाथ पाटील, जतीन शेख, सुनील देशमुख, ज्येष्ठ नागरिक जालिंदर यादव, अशोक यादव, रामचंद्र यादव, सुरेश यादव, निवास यादव, बाळकृष्ण यादव, विश्वनाथ यादव यांच्यासह ग्रामसेवक एस.एस. होलमुखे व मक्तेदार आशिष नांगरे उपस्थित होते.
यावेळी अंगणवाडी सेविका रेखा यादव, सुरेखा वायदंडे, रुपाली पवार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. गावातील नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीने हा उपक्रम केला असून त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी वाॅटर एटीएम कार्डचे वाटप करण्यात आले. ग्रामस्थांनी या योजनेचा जास्तीत जास्त उपयोग करून शुद्ध पाणी पिण्यास वापरावे असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले.
फोटो कॅप्शन
नारायणवाडी ता. कऱ्हाड येथे वॉटर एटीएम सेंटरचा ज्येष्ठ नागरिक व माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीरंग नलवडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. (छाया : माणिक डोंगरे)
160721\img-20210714-wa0009.jpg
फोटो कॕप्शन
नारायणवाडी ता. कराड येथे वॉटर एटीएम सेंटरचा ज्येष्ठ नागरिक व माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीरंग नलवडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. (छाया- माणिक डोंगरे)