वेळेत कर भरणाऱ्यांना वॉटर एटीएम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:39 AM2021-03-31T04:39:06+5:302021-03-31T04:39:06+5:30
ग्रामपंचायत करवसुलीमुळे ग्रामपंचायतींना स्थानिक विकासकामांना गती देता येते. मात्र, गावगाडा चालवित असताना अनेक जण हा करच वर्षानुवर्षे थकीत ठेवत ...
ग्रामपंचायत करवसुलीमुळे ग्रामपंचायतींना स्थानिक विकासकामांना गती देता येते. मात्र, गावगाडा चालवित असताना अनेक जण हा करच वर्षानुवर्षे थकीत ठेवत असतात. त्यामुळे स्थानिक विकासकामांना अडचणी निर्माण होत असतात. गावातील सर्वच ग्रामस्थांनी हा ग्रामपंचायत कर वेळेत भरल्यास विकासकामे करण्यासाठी मदत होत असते. वहागाव ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच संग्राम पवार, उपसरपंच आनंदी पवार, ग्रामविकास अधिकारी एस. बी. घुटे व सहकाऱ्यांनी ग्रामपंचायत कर वेळेत भरणाऱ्यांना गावच्या वॉटर एटीएममधून शुद्ध पाण्यासाठी अडीचशे रुपयांचा रिचार्ज व तीस रुपयांचे वॉटर एटीएम कार्ड मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.
वहागाव ग्रामपंचायतीच्या या योजनेचा प्रत्येक कुटुंबासाठी चांगला उपयोग होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ही योजना जाहीर करताच गावातील पन्नासहून अधिक कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कर वेळेत भरून ग्रामपंचायतीच्या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच संग्राम पवार व ग्रामविकास अधिकारी एस. बी. घुटे यांनी केले आहे.
- कोट
ग्रामपंचायतीने कर वसुलीसाठी घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या या योजनेमुळे ग्रामस्थांचाही चांगला फायदा होत आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कर भरून या योजनेचा लाभ घ्यावा.
- रत्नदीप पवार
ग्रामस्थ, वहागाव
फोटो : ३०केआरडी०१
कॅप्शन : वहागाव, ता. कऱ्हाड येथे वेळेत कर भरणा करणाऱ्या ग्रामस्थांना ग्रामपंचायतीतर्फे वॉटर एटीएम कार्ड देण्यात येत आहे.