पाणी आटले अन् जुने धरण दिसले..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 11:26 PM2019-06-03T23:26:30+5:302019-06-03T23:26:35+5:30

खंडाळा : सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वीर धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे ब्रिटिशांनी बांधलेले जुने धरण दिसू लागले ...

Water came out and saw the old dam ..! | पाणी आटले अन् जुने धरण दिसले..!

पाणी आटले अन् जुने धरण दिसले..!

googlenewsNext

खंडाळा : सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वीर धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे ब्रिटिशांनी बांधलेले जुने धरण दिसू लागले आहे. गेले अनेक वर्षे धरणाच्या पाण्यात राहूनही जुने धरण आजही चांगल्या स्थितीत आहे. सात वर्षांनतर पुन्हा वर आलेल्या हे जुने धरण पाहण्यासाठी नागरिक या ठिकणी गर्दी करत आहेत.
वीर धरणाची निर्मिती १९२० ते १९२७ मध्ये करण्यात आली होती. याच दरम्यानच्या काळात भाटघर धरण बांधण्यात आले. १९१३ मध्ये भाटघर धरण बांधण्यास सुरुवात करण्यात आली. १९२८ मध्ये हे धरण पूर्ण करण्यात आले. वीर धरणाची क्षमता कमी असल्याने या धरणावर नवीन वीर धरण बांधण्याची संकल्पना पुढे आली. नवीन वीर धरणाचे बांधकाम १९६२ मध्ये सुरू करण्यात आले. १९६४ मध्ये हे धरण पूर्ण झाले. १९६७ मध्ये या धरणातून कालव्याद्वारे पहिले आवर्तन सोडण्यात आले. या धरणाच्या बांधकाम विषयावर परिसरातील अनेक जुन्या, ज्येष्ठ नागरिकांनी मजुरी केली असल्याचे सांगतात.
नीरा नदीवर १९९६ मध्ये नीरा-देवघर धरण बांधण्यास सुरुवात करून २००७ मध्ये देवघर धरण पूर्ण करण्यात आले.
१९६२ मध्ये या धरणावर नवीन वीर धरण बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. १९६४ मध्ये हे धरण पूर्ण करून १९६७ रोजी धरणातून पहिले आवर्तन कालव्याद्वारे सोडण्यात आले होते. यावर्षी धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने जुन्या धरणाचे अवशेष पाहायला मिळत आहेत. सुमारे ९२ वर्षांपूर्वीचे हे बांधकाम आजही जसेच्या तसे असल्याने ब्रिटिशकालीन बांधकामाची गुणवत्ता लक्षात येत आहे.

ब्रिटिशकालीन अवशेष आजही सुस्थितीत
जुने वीर धरण पाहताना पाणी अडविण्यासाठी धरणाचा घालण्यात आलेला बांध, धरणाचे दरवाजे, जुने जॅकवेल, जुने पॉवर हाऊस, धरणाचा डावा व उजवा कालव्याद्वारे करण्यात येणारी पाण्याची वितरण व्यवस्था, धरणावर व कालव्यावर जाण्यासाठीचे साकव पूल, कालव्यातून शेतीला पाणीपुरवठा व्यवस्था आदी ब्रिटिशकालीन धरणाचे अवशेष आजही सुस्थितीत आहेत.

Web Title: Water came out and saw the old dam ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.