नीरा-देवघर उजवा कालव्याचे पाणी आवर्तन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:39 AM2021-09-19T04:39:04+5:302021-09-19T04:39:04+5:30

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील नीरा-देवघर लाभक्षेत्रातील गावांमध्ये पावसाने ओढ दिली असल्याने पीक पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला होता. ...

Water cycle of Nira-Devghar right canal starts | नीरा-देवघर उजवा कालव्याचे पाणी आवर्तन सुरू

नीरा-देवघर उजवा कालव्याचे पाणी आवर्तन सुरू

googlenewsNext

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील नीरा-देवघर लाभक्षेत्रातील गावांमध्ये पावसाने ओढ दिली असल्याने पीक पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला होता. त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन नीरा-देवघर उजवा कालव्याचे पाणी आवर्तन सुरू करण्यात आले आहे. हा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी खंडाळा तालुका विकास प्रतिष्ठानचे सचिव डॉ. विजय शिंदे यांनी नीरा-देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांचे संपर्क करून त्यांना पाणी आवर्तन देण्याविषयी विनंती केली होती. याला सकारात्मक प्रतिसाद देत दि. १४ सप्टेंबर सकाळी १० वाजल्यापासून १५० क्युसेकने व तो वाढवून दि. १७ सप्टेंबर सायंकाळी ५ वाजल्यापासून २०० क्युसेकने विसर्ग कालव्यात सुरू केला आहे.

यामुळे खंडाळा तालुक्यातील लाभक्षेत्रातील पीक पाण्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटण्यास मदत होणार आहे. याबद्दल डॉ. विजय शिंदे यांनी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल व त्यांचे सर्व सहकारी यांचे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानले.

Web Title: Water cycle of Nira-Devghar right canal starts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.