धरणातील पाणी फ क्त पिण्यासाठीच
By admin | Published: July 11, 2014 12:22 AM2014-07-11T00:22:04+5:302014-07-11T00:30:08+5:30
पालकमंत्री : टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सूचना
सातारा : ‘जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांतील पाणी कोणत्याही परिस्थितीत फ क्त पिण्यासाठीच राखून ठेवण्यात यावे, पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी पाण्याचा चोरून वापर होत असल्यास तत्क ाळ पोलिसांत गुन्हे दाखल क रावेत,’ असे आदेश पालकमंत्री शशिक ांत शिंदे यांनी आज दिले.
जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा, टंचाई उपाययोजना तसेच कायमस्वरूपी दुष्काळ निवारण उपाययोजना व अतिवृष्टीग्रस्तांना नुकसान भरपाईबाबत आढावा बैठकीचे नियोजन भवनात शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार विक्रमसिंह पाटणकर, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., मुख्य कार्यकारी अधिक ारी अभिजित बांगर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पराग सोमन उपस्थित होते.
पाऊस लांबल्याने टंचाई उपाययोजनांना राज्य शासनाने ३१ जुलैपर्यंत मुदत वाढ दिली आहे, असे सांगून शिंदे म्हणाले, ‘टंचाई उपाययोजना राबविण्यास सर्वांनी गांभीर्याने प्राधान्य द्यावे. गरज पडल्यास ३१ जुलैनंतरही या उपाययोजनांना मुदत वाढ दिली जाऊ शक ते, लघुपाटबंधारे प्रक ल्पांची १३३ क ामांची यादी त्वरित अतिरिक्त क ामे व पाझर तलाव यांचा आराखडा क रून सादर क रावा. कृषी विभागानेही जुन्या बंधाऱ्यांचा विषय हाती घ्यावा,’ असेही ते म्हणाले. नवीन विंधन विहिरी घेताना मंजूर क ामे गतीने पूर्ण क रावीत. तसेच ज्या ठिक ाणी विंधन विहिरी शक्य आहेत. (प्रतिनिधी)