प्रादेशिक नळयोजनांसमोर वीजबिलासह पाणी वाटपाचे संकट
By admin | Published: June 26, 2017 02:27 PM2017-06-26T14:27:00+5:302017-06-26T14:27:00+5:30
खटाव तालुक्यातील स्थिती
आॅनलाईन लोकमत
मायणी , दि. २६ : खटाव तालुक्यातील येराळवाडी तलावातून तालुक्यातील सुमारे ३५ गावांसाठी चार प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आल्या होत्या. या चारही प्रादेशिक नळपाणी योजनांपुढे वीजबिलाचे व पाणी पट्टीच्या पैशांचे संकट उभा राहिल्यामुळे वडूजसह तीन गावांचा अपवाद वगळता सर्व योजना सध्या बंद अवस्थेत असल्यामुळे या गावांना बाराही महिने पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
तालुक्यात एकमेव येराळवाडी मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पामधून फक्त रब्बी हंगामातच शेतीसाठी पाटाने पाणी दिले जाते. इतरवेळी या तलावातून पाणी पिण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे तालुक्यातील बहुतांशी पाणी योजना याच तलावावर आहे.