नीरा-देवघर कालव्याचा पाणी प्रवाह सुरळीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:48 AM2021-07-07T04:48:08+5:302021-07-07T04:48:08+5:30
खंडाळा : खंडाळासारख्या दुष्काळी तालुक्यात नीरा-देवघर प्रकल्पाचे पाणी कालव्याद्वारे पोहोचल्यामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, या कालव्याला झाडाझुडपांचा वेढा ...
खंडाळा : खंडाळासारख्या दुष्काळी तालुक्यात नीरा-देवघर प्रकल्पाचे पाणी कालव्याद्वारे पोहोचल्यामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, या कालव्याला झाडाझुडपांचा वेढा पडल्याने आवर्तन सुटले तरी पाण्याचा प्रवाहाला अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे पाण्याची गती कमी होत असल्याने तालुक्याच्या शेवटच्या टप्प्यात पाणी पोहचण्यास अडचण येत होती. झुडपांच्या गर्तेत अडकलेल्या या कालव्याचा प्रवाह सुरळीत करावा, याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर प्रशासनाने कालव्यांची सफाई करीत पाणी प्रवाह सुरळीत केला. त्यामुळे गावोगावच्या ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
खंडाळ्याच्या दुष्काळी भागाला वरदान ठरलेल्या नीरा-देवघर कालव्यात काटेरी झाडाझुडपांची वाढ झाली होती. त्यामुळे कालव्यातील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा झाला होता. याशिवाय कालव्याच्या बाजूने असणारा रस्ताही झुडपांमुळे बंद झाल्याने शेती मालाच्या वाहतुकीची अडचणीत आली होती. याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर कालव्यातील पात्रात आणि बाजूने वाढलेली असंख्य झाडेझुडपे पाटबंधारे विभागाने काढण्याची मोहीम हाती घेतली. त्यामुळे कालव्याचा प्रवाह सुरळीत झाला आहे.
कोट...
नीरा-देवघर कालव्यात वाढलेली काटेरी झुडपे पाणी प्रवाहास अडथळा ठरत होती. झुडपांची मुळे खोल वाढल्याने कालव्याच्या पाण्याची गळतीही चालू होती. त्यामुळे आवर्तन नियमाने सुटले तरी सर्व गावांना समान पातळीवर पाणी पोहोचत नव्हते. याबाबत ‘लोकमत’शी संपर्क साधून समस्या मांडल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेतली. त्यामुळे संबंधित विभागाने झुडपे काढून पाणी प्रवाह सुरळीत केला.
-हर्षवर्धन भोसले, सरपंच, शिवाजीनगर
...............................................
०५खंडाळा
नीरा-देवघर कालव्यातील पात्रात आणि बाजूने वाढलेली असंख्य झाडे झुडपे पाटबंधारे विभागाने काढण्याची मोहीम हाती घेतली.