पाणी पातळी खालावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:38 AM2021-03-19T04:38:03+5:302021-03-19T04:38:03+5:30
रस्ता खड्ड्यात कऱ्हाड : कार्वे-कोरेगाव रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ...
रस्ता खड्ड्यात
कऱ्हाड : कार्वे-कोरेगाव रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. खड्डे पडले की त्याची तात्पुरती डागडुजी केली जाते. सध्या रस्त्याची अवस्था बिकट असून रस्ता पूर्णपणे खड्ड्यात गेला आहे.
पुलावर अंधार
कऱ्हाड : येथील कृष्णा नदीवरील नवीन पुलावर दिव्यांची सोय करावी, अशी मागणी नागरिक, वाहनधारकांतून होत आहे. २०१९ साली आलेल्या महापुरात जुना पूल कोलमडून पडला. त्यामुळे नवीन पुलावरून सध्या अनेक नागरिकांचा प्रवास व वाहतूक सुरू आहे. नागरिक रात्री या पुलावरून पायी ये-जा करतात. त्यामुळे या ठिकाणी दिव्यांची सोय आवश्यक आहे.
पाणी पातळी खालावली (फोटो : १८इन्फो०२)
कुसूर : विंग, ता. कऱ्हाड परिसरात उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने विहीर व बोअरची पाणी पातळी खालावली आहे. अनेक दिवसांपासून पाणी मिळत नसल्यामुळे पिकांची उत्पादन क्षमताही कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी रात्रीही शिवारात थांबत आहेत. मात्र, वन्यप्राण्यांच्या वावरामुळे त्यांच्या जिवाला धोका आहे.
रस्त्यावर कचरा
कऱ्हाड : कृष्णा कॅनॉल ते ओगलेवाडी येथील गणपती मंदिर यादरम्यान चौपदरी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कचरा साचत आहे. या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सैदापूर ग्रामपंचायत हद्दीत हा कचरा आहे. ग्रामपंचायतीने रस्त्यानजीकचा कचरा हटवावा, अशी मागणी केली जात आहे.