कास तलावाचा पाणीसाठा पाच फुटांवर
By admin | Published: June 12, 2017 12:41 PM2017-06-12T12:41:15+5:302017-06-12T12:41:15+5:30
मान्सूनची प्रतीक्षा : पाऊस वेळेवर न आल्यास इंजिनद्वारे पाणी उपसा
Next
आॅनलाईन लोकमत
पेट्री (जि. सातारा) , दि. १२ : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीपातळीत कमालीची घट होत आहे. अजुनही मान्सून दाखल होण्याची चिन्हे दिसत नसल्याने पाणीटंचाईची समस्या गडद होऊ लागली आहे.
सद्य स्थितीला तलावात केवळ पाच फुट दहा इंच इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. तलावात साडेचार ते पाच फुटापर्यंत पाणीसाठा शिल्लक राहिल्यास इंजिनद्वारे पाणी उपसून पाटात सोडावे लागणार आहे.
कास तलावात किनाऱ्यालगत २५ फुटांपर्यंत पाणीसाठा होतो. २०१५ साली २३ जूनला तर गतवर्षी ३ जुलैला तलाव पूर्र्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहत होते. परंतु यंदा मान्सून दाखल होण्याचे संकेत अजुनही दिसत