उंडाळे भागातील शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न मार्गी लावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:26 AM2021-06-28T04:26:12+5:302021-06-28T04:26:12+5:30
कऱ्हाड : ‘उंडाळे भागातील शेतकरी सभासदांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमच्या काळात विशेष प्रयत्न करण्यात आले. शेतकरी सभासदांच्या मागणीनुसार ...
कऱ्हाड : ‘उंडाळे भागातील शेतकरी सभासदांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमच्या काळात विशेष प्रयत्न करण्यात आले. शेतकरी सभासदांच्या मागणीनुसार कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून वाकुर्डे योजनेची थकीत वीजबिलाची १५ लाख ८० हजार रुपयांची रक्कम भरण्यात आली. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाले. येत्या काळातही या भागातील शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार पॅनेलच्या वतीने विशेष प्रयत्न केले जातील,’ अशी ग्वाही कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.
उंडाळे विभागातील सभासद मेळाव्यात ते बोलत होते. जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी दयानंद पाटील, गुणवंतराव पाटील, निवासराव थोरात, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील, पांडुरंग होनमाने, श्रीरंग देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ‘गेल्या सहा वर्षांत आम्ही शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर दिला आहे. सरासरी हा दर ३००० रुपये इतका आहे. आम्ही पारदर्शक व नियोजनबद्ध असा कारभार केला. कृष्णा कारखाना एक कुटुंब आहे, या विचाराने काम आम्ही केले. येत्या काळातही कृष्णा कारखाना शेतकरी सभासद हिताचे अनेक उपक्रम राबविणार आहे. तसेच कारखान्याची गाळपक्षमता ९००० मेट्रिक टनावरून १२,००० मेट्रिक टन वाढविण्याचा आमचा मानस आहे. जयवंत आदर्श योजना अधिकाधिक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे.
या वेळी जिंतीचे सरपंच जयवंत शेवाळे, महारूगडेवाडीचे उपसरपंच अजित महारूंगडे, घोगावचे उपसरपंच निवास शेवाळे, मनवचे उपसरपंच दादासो शेवाळे, डॉ. सुरेश पाटील, पंकज पाटील, सतीश पाटील, अशोक पाटील, आण्णासो शेवाळे, रामचंद्र भावके, पैलवान सचिन बागट, काशीनाथ पाटील, डी. एस. पाटील, हणमंतराव थोरात, सर्जेराव थोरात यांच्यासह सभासद उपस्थित होते.
मारुती शेवाळे यांनी प्रास्तविक केले. संजय शेवाळे यांनी आभार मानले.