३३ कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्ट्यावर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 02:58 PM2019-04-12T14:58:56+5:302019-04-12T15:00:29+5:30
हरित महाराष्ट्र अभियानाचा महाराष्ट्र राज्यात वनाच्छादनाखाली असणाºया जमिनीचे क्षेत्र वाढविण्यासाठी २६ जानेवारी २०१४ पासून हा निर्णय अंमलात आला आहे. या अभियानांतर्गत शासनाचे ५० कोटी वृक्ष लागवढीचे उद्दिष्ट्य आहे
सणबूर : हरित महाराष्ट्र अभियानाचा महाराष्ट्र राज्यात वनाच्छादनाखाली असणाºया जमिनीचे क्षेत्र वाढविण्यासाठी २६ जानेवारी २०१४ पासून हा निर्णय अंमलात आला आहे. या अभियानांतर्गत शासनाचे ५० कोटी वृक्ष लागवढीचे उद्दिष्ट्य आहे. मात्र, दुसरीकडे परिसरात लावल्या जाणाºया वणव्यांमुळे हजारो कोटी वृक्ष जळून खाक होत असून, हरित महाराष्ट्र अभियानाचा बोजवारा उडाला आहे.
वनक्षेत्रांमध्ये वनांमधील रोपांच्या नैसर्गिक पुनर्निर्मितीवर भर देण्यासाठी हरित महाराष्ट्र अभियान ही योजना शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने सर्वत्र राबविण्यात आली. परंतु सर्रास वनक्षेत्र असलेल्या वनांना उन्हाळ्यात वनवे लावले जात असल्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्र जळून खाक होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील डोंगराळ क्षेत्रातील वनक्षेत्र कमी होत आहे. जरी हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत शासनाचे पाच वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवड करून वनक्षेत्र वाढविण्याचे अजेंडा ठेवला असला तरी या वणव्याच्या मालिकेमुळे ते शक्य होणार नाही.