यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर कृष्णा-कोयनेच्या पाण्याचे शिंपण, राजकारण्यांच्या स्पर्शाने स्मृतिस्थळ अपवित्र झाल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 01:32 PM2017-11-27T13:32:12+5:302017-11-27T15:22:28+5:30
‘यशवंतराव चव्हाण यांची तत्वं वेशिला टांगणाऱ्या राजकीय नेत्यांना शेतकरी, त्यांच्या मुला-मुलींच्या आत्महत्या दिसत नाहीत. अशा राजकारण्यांच्या स्पर्शाने यशवंतराव चव्हाण यांचं स्मृतिस्थळ अपवित्र झालं आहे,’ असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी स्मृतिस्थळावर कृष्णा, कोयना नदीतील पाण्याचं शिंपण केलं.
कऱ्हाड - ‘यशवंतराव चव्हाण यांची तत्वं वेशिला टांगणाऱ्या राजकीय नेत्यांना शेतकरी, त्यांच्या मुला-मुलींच्या आत्महत्या दिसत नाहीत. अशा राजकारण्यांच्या स्पर्शाने यशवंतराव चव्हाण यांचं स्मृतिस्थळ अपवित्र झालं आहे,’ असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी स्मृतिस्थळावर कृष्णा, कोयना नदीतील पाण्याचं शिंपण केलं.
‘यशवंत विचारांची नावे घेऊन भाषणे केली जातात. मतासाठी यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेतलं जातं. परंतु कृती विरोधी केली जाते. या सर्व राजकीय नेत्यांच्या स्पर्शाने अपवित्र झालेले स्मृतीस्थळ कृष्ण कोयनेच्या पवित्र पाण्याने स्वच्छ केलं,’ असे यावेळी सांगण्यात आलं.
यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, अनिल घराळ, कऱ्हाड उत्तरचे तालुकाध्यक्ष प्रमोदसिंह जगदाळे, युवा आघाडी अध्यक्ष, रोहित पाटील योगेश झांबरे उपस्थित होते.
हे आंदोलन रविवारीच करण्यात येणार होतं. परंतु, पोलिसांना अगोदरच सुगावा लागल्याने बंदोबस्त वाढविण्यात आला होता. त्यामुळे हे आंदोलन करता आले नव्हते. ते सोमवारी करण्यात आलं.