पाणी पेरणीला फळ आलं या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 11:25 PM2017-08-07T23:25:29+5:302017-08-07T23:25:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
औंध : ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत खटाव तालुक्यातील भोसरे गावाने राज्यात विभागून द्वितीय क्रमांक पटकाविला. कायम दुष्काळी खटाव तालुक्यातील भोसरेतील ग्रामस्थांनी ४५ दिवस तळपत्या उन्हात केलेल्या पाणी पेरणीला जणू फळंच आलं आहे. त्यामुळे या गावात आनंदाचं तुफानच आलं आहे.
कायम दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी ८ एप्रिल ते २२ मे या ४५ दिवसांत भर उन्हाळ्यात हजारो हात श्रमदान करीत होते.
गट-तट विसरून एकदिलाने काम करीत होते. दुष्काळी भोसरे पाणीदार बनविण्याचे स्वप्न पाहिलेल्या ग्रामस्थांना रविवारी स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यावर आनंदाश्रू आवरता आले नाही. गावात एकच जल्लोष करण्यात आला.
‘लोकमत’ला धन्यवाद
‘भोसरे ग्रामस्थांनी केलेल्या कामाला ‘लोकमत’ने वेळोवेळी प्रसिद्धी दिल्यामुळे कामे करण्यास उत्साह निर्माण झाला.’ अशा शब्दात भोसरे ग्रामस्थांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले.
स्पर्धेच्या कालावधीत शिवजयंती, महाराष्ट्र दिन, बुद्धपौर्णिमा हे सणही ग्रामस्थांनी श्रमदानाच्या ठिकाणी जाऊन श्रमदान करत गावकºयांनी साजरे केले.
नववधू-वरांसह
वºहाडी मंडळींनीही श्रमदान
सिनेअभिनेते आमिर खान, किरण राव, मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, प्रिया खान, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचेसह अनेक मान्यवरांनी श्रमदान करून उत्साह वाढविला. दोन जवानांनी श्रमदानाच्या ठिकाणी लग्न करून नववधू वरांसह वºहाडी मंडळींनीही श्रमदान करीत आदर्श निर्माण केला. गावच्या विकासाचा प्रश्न येईल, त्यावेळी अशीच एकजूट करून कामे करतील,’ अशा भावना अनेकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
हृदयात धडधड अन् डोळ्यात अश्रू
स्पर्धेचा निकाल ऐकण्यासाठी दोनशेहून अधिक ग्रामस्थांनी पुण्यात हजेरी लावली. चढत्याक्रमाने नंबर घोषित व्हायचे तसतसे हृदयात धडधड वाढायची. तिसºया क्रमांकापर्यंत नाव आले नाही म्हणजे भोसरे पहिले किंवा दुसरे असणारच असा विश्वास मनात होता. द्वितीय क्रमांकाचा निकाल घोषित झाल्यावर अक्षरश: स्टेडियममध्येच जल्लोष केला.