ग्रीन पॉवरकडून गोपूजसाठी पाणीपुरवठा योजना

By admin | Published: April 3, 2017 06:30 PM2017-04-03T18:30:38+5:302017-04-03T18:30:38+5:30

कामास प्रारंभ : १ कोटी ३५ लाख रुपये खर्च; पाण्याचे संकट टळणार

Water supply scheme for Green Power | ग्रीन पॉवरकडून गोपूजसाठी पाणीपुरवठा योजना

ग्रीन पॉवरकडून गोपूजसाठी पाणीपुरवठा योजना

Next

आॅनलाईन लोकमत

औंध, दि. ३ : गोपूज, ता. खटाव येथील ग्रीन पॉवर शुगर्स लि., या साखर कारखान्याच्या माध्यमातून साकारलेल्या व तब्बल १ कोटी ३५ लाख एवढा खर्च असणाऱ्या सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाचा प्रारंभ उत्साहात झाला.
दरम्यान, या योजनेमुळे गावातील पिण्याच्या पाण्याचे संकट टळणार आहे.


यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर हणमंतराव जाधव, स्वरूप देशमुख, संचालक दिलीप घार्गे, माणिकशेठ देशमुख, विनायक घार्गे, उपसरपंच नितीन घार्गे, महादेव जाधव, संभाजी घार्गे, बाबासो घार्गे, बाळासो चव्हाण, दत्तात्रय घार्गे, वसंत देशमुख, धनाजी घार्गे, उमेश घार्गे, अनिल शिंदे, संजय गुरव, धनाजी पाटील, संतोष पवार, श्रीरंग घार्गे, सुरेश कणसे, जालिंदर घार्गे, सत्यवान शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.


जनरल मॅनेजर जाधव म्हणाले, ह्यकारखान्याच्या निर्मितीपासून ठोस आणि मोठे शाश्वत काम गोपूज गावास देण्याचे स्वप्न कारखान्याचे सर्वेसर्वा संग्रामसिंह देशमुख यांचे होते. त्याचाच एक भाग म्हणून कारखान्याने गावाची प्रमुख गरज व महत्त्वाचा पिण्याचा पाणीप्रश्न सोडविण्याचा निर्णय घेऊन १ कोटी ३५ लाख एवढा खर्च असणाऱ्या योजनेस मंजुरी घेतली. येत्या महिन्याभरात हे काम पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, लवकरच गोपूजकरांना शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करण्यात येईल.
यावेळी कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Water supply scheme for Green Power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.