करंजे पेठेत सलग पाच दिवस टँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:41 AM2021-07-28T04:41:01+5:302021-07-28T04:41:01+5:30
करंजे : करंजे पेठेमध्ये सलग पाच दिवस पिण्यासाठी व वापरासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य ...
करंजे : करंजे पेठेमध्ये सलग पाच दिवस पिण्यासाठी व वापरासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य पंप स्टेशनवरून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी खराब झाल्याने करंजेसह परिसरातील पाणीपुरवठा गेल्या पाच दिवसांपासून बंद आहे. बॉम्बे रेस्टॉरंट शेजारी असणाऱ्या मुख्य पाईपलाईनचा एल्बो नादुरुस्त झाल्याने हा पाणीपुरवठा बंद झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातून त्याची चार दिवसांत मागणी करून घेतली गेल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु करंजे व आजूबाजूला असणाऱ्या परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी येथील नगरसेवकांनी चक्क सलग पाच दिवस टँकरने पाण्याची व्यवस्था केली आहे. नगरसेवक टँकरबरोबर उभे राहून सर्वांना योग्यरित्या पाणी वाटप करतानाचे चित्र पहावयास मिळत आहे. नागरिकांनी मिळालेले पाणी उकळून प्यावे व विनाकारण पाणी वाया घालवू नये असे आवाहन नगरसेवकांनी केले आहे.